Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

आमदाबाद विद्यालयात नवगतांचे उत्साहात स्वागत

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
माननीय पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आमदाबाद या विद्यालयामध्ये नव्याने प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले.

शिक्षण विभागाच्या नियमावलीनुसार २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करणे हे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा *प्रवेशोत्सव* साजरा करण्यात आला.

सकाळी ठीक १०:३०वाजता राष्ट्रगीत आणि प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्येची देवी सरस्वतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके, गुलाब पुष्प,चॉकलेट देऊन त्यांचे औक्षण करण्यात आले.

या कार्यक्रमा साठी:

या कार्यक्रमासाठी मलठण केंद्राचे केंद्रप्रमुख शांताराम पवार सर, आमदाबादच्या सरपंच सौ. अनिताताई घुले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे पाटील, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाशमामा सोनार, विद्यमान शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दत्तात्रय शेलार, माजी मुख्याध्यापक फक्कडराव थोरात सर, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ घुले, दीपक साळवे इ. मान्यवर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

आभार व सूत्रसंचालन:

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्वातीताई थोरात मॅडम यांनी केले, पोटे सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पोंदेसर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21