Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

सिताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन.

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी. व बी. फार्मसी.) तसेच इंडियन फार्मासुटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १५ मार्च रोजी राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये पुणे, अहमदनगर इत्यादी विभागातील एकूण ५४ गटांनी सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. नारायण घनगावकर, डॉ. सचिन कोतवाल, बाबाजी गलांडे डॉ. द्वारकादास बाहेती ( प्राचार्य सिताबाई थिटे कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिरूर) व डॉ. अमोल शहा (प्राचार्य सिताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी, शिरूर) यांच्या हस्ते करण्यात
आले.
डॉ. नारायण घणगावकर सर यांनी विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील संधी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. अमोल शहा सर यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होत असताना त्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. अशा स्पर्धांमुळे त्यांचा आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, सादरीकरण कौशल्य या सर्व कौशल्यांचे दृढीकरण होते असे मत व्यक्त केले .
डॉ. द्वारकादास बाहेती सर यांनी या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांतील संशोधन कौशल्य वृद्धिंगत होण्यास सहकार्य होते असे मत व्यक्त केले. तसेच सरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यातील गुण सादर करण्याकरता पाठवलेल्या इन्स्टिट्यूटचे आणि प्राचार्यांचे ही कौतुक करून आभार मानले.

बाबाजी गलांडे यांनी कॉलेजने आयोजित केलेल्या या स्पर्धे बाबत महाविद्यालयाचे तसेच सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन केले.
या स्पर्धेमध्ये डी. फार्मसी विभागातून प्रथम क्रमांक सय्यद अल्ताफ व शिकारे श्रीअनंता (मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई), द्वितीय क्रमांक महाडिक अदिती व साळवे कृतिका (विशाल जुन्नर सेवा मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फाॅर वुमन्स, आळे) तर तृतीय क्रमांक शेळके ऋषिकेश व आसवले श्रद्धा (मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी विरगाव, अकोले) आणि फराहानाज नईम व सलोनी मुंडे (फॅकल्टी ऑफ फार्मसी काष्टी श्रीगोंदा) यांनी पटकावला.
बी. फार्मसी. विभागातून प्रथम क्रमांक अभिषेक कोळी व सानिका साळुंखे (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे), द्वितीय क्रमांक असिला शेख व यु. सय्यद (सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, कोंढवा) तर तृतीय क्रमांक यश कणसे व करण इंगोले (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव सहानी) यांनी पटकावला.
या स्पर्धेसाठी डॉ. सचिन कोतवाल सर व डॉ. नारायण घनगावकर सर यांनी परीक्षक म्हणून योगदान दिले.
प्रमुख पाहुणे व परीक्षकांनी या स्पर्धेसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून निमंत्रक डॉ. द्वारकादास बाहेती, डॉ.अमोल शहा, समन्वयक डॉ. मनोज तारे, प्रा. विशाल कारखिले, संयोजन समिती सदस्य डॉ. अमित लुंकड प्रा .भाग्यश्री तळोले प्रा. सारिका झाडे, प्रा. मानसी गरदरे, प्रा. हेमांगी झिंजुर्के, प्रा. निखिल केदारी यांचे कौतुक केले.
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १५००/-, १०००/-, ७००/- रुपये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ .राजेंद्रजी थिटे व सचिव धनंजय थिटे, प्रमुख पाहुणे, प्राचार्य व परीक्षकांनी सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डॉ. मनोज तारे व प्रा. विशाल कारखिले यांनी सूत्रसंचालन पार पाडले तर डॉ. अमित लुंकड यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21