शिरूर प्रतिनिधी:
काही दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील पिलीव गावातील 23 वर्षाच्या तरुणाला 11 मार्च रोजी रात्री दहा वाजता फ़ोन करून बोलण्यात आले व दुसऱ्या दिवशी त्या तरुणाचा चटके देत खून करून,त्याचा मूर्तदेह फॉरेस्ट मध्ये फेकून देण्यात आला होता.
ही घटना ताजी असतानाच श्रीगोंदा व शिरूर तालुक्याचे शिवेवर दाणेवाडी ता. श्रीगोंदा या ठिकाणी 18 ते 22 वयाच्या अनोळखी तरुणाला विवस्त्र करत डोके,दोन हात व एक पाय तोडत त्याचा मृतुदेह विहिरी मध्ये टाकण्यात आला आहे.
बीडच्या मस्साजोग नंतर सोलापूर व नंतर शिरूर श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवरही दाणेवाडी ता श्रीगोंदा येथे असा घडला निर्घुण खून झाल्या मुळे,कायद्याची भिती संपली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिरूर श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी गावातील तरुणाचे शीर धडा वेगळे करत दोन हात एक पाय तोडले ,तर एक पाय अर्धवट तोडला. नग्न अवस्थेतील असा मृतदेह विहिरीत टाकलेला आढळून आल्या मुळे संपूर्ण महाराष्ट आदरून गेला आहे.
या मृतदेहाचे शीर ,दोन हात व एक पाय नसल्याचे दिसून आले आहे. तर एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणा ही आढळून आल्या आहेत.यामुळे शिरूर व श्रीगोंदा तालुक्यात पालकांमध्ये खळबळ उडाली आहे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा मृतदेह दाणेवाडी येथील महाविद्यालयीन तरुणाचा असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
जीवाचा थरका उडवणारा मृतदेह पाहून अनेकांच्या जीवाची घबराट उडाली तर आपल्या मुलांचे भवितव्य धोक्यात आहे? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मृतदेहाचे शीर दोन्ही हात व पाय सापडलेला नाही.
नक्की हा मृतदेह कोणाचा याबाबत शंका कुशंका सुरू असली तरी दानेवाडी ता श्रीगोंदा येथील माऊली सतिश गव्हाणे हा 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुण ७ मार्च २५पासून बेपत्ता असल्याचे त्याचे चुलते अनिल परशुराम गव्हाणे यांनी सांगितले याबाबतची मिसिंगची फिर्याद त्याचा भाऊ अविनाश सतीश गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
परंतु हा मृतदेह नक्की त्याचा का ?आणखी कोणाचा याबाबत आज तरी शंका आहे.
शिरूर पोलीस स्टेशन येथे आज मिसिंग तरुणाचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली असून, दाणेवाडी येथे सापडलेला मृतदेह हा त्यांच्यात मुलाचा असू शकतो .परंतु मृतदेहाचे शीर, दोन्ही हात, उजवा एक पाय नसलेला , डावा पाय अर्धा तुटलेला अवस्थेत सापडल्याने कुटुंबही द्विधा मनस्थिती मध्ये आहे.
मिसिंग फिर्यादी बाबत चौकशी सुरू असून सीसी टीव्ही कॅमेरे फुटेज जमा करण्याचे काम सुरू आहे. दाणेवाडी येथील मृतदेह बाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग, श्रीगोंदा पोलीस, अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभाग पथके तपासासाठी रवाना झाली आहे.
