Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

जागतिक महिलादिनी ‘छावा’च्या स्क्रिनिंगचे आयोजन

Facebook
Twitter
WhatsApp

शिक्रापूर प्रतिनिधी:भरत चव्हाण
महिलादिनानिमित्त स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष तेजस यादव यांच्या संकल्पनेतून स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील शेकडो महिलांनी आपल्या व्यस्त संसारातून वेळ काढून हा चित्रपट पाहत अनोखा महिलादिन साजरा केला.

‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी कशा प्रकारे स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी कष्ट घेतले व त्यांच्या धर्मपत्नी सौ सखी येसूबाई यांची या स्वराज्याच्या भक्कम वाटचालीत एक महिला म्हणून कशी साथ लाभली, याचा वस्तुपाठ या चित्रपटात आहे.
त्यामुळे महिलादिनी हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो. यामुळेच आम्ही महिलांसाठी या स्क्रिनिंगचे आयोजन केले होते,यानिमित्ताने संसारात रमलेल्या या आमच्या लाडक्या माता भगिनींनी एक दिवस मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहुन अनोखा महिलादिन साजरा केला असल्याची माहिती,आयोजक तेजस यादव यांनी दिली.

यावेळी निमगाव म्हाळुंगीच्या मा. उपसरपंच सौ. अश्विनीताई लांडगे, मा. उपसरपंच सौ. कविता चौधरी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ लांडगे, अजित चौधरी, शिवसेना शाखाप्रमुख दशरथ नागवडे, अरविंद भिवरे, सागर नागवडे, भरत काळे, सुखदेव रणसिंग, नरेंद्र गडदे, प्रसन्न चव्हाण तसेच सर्व महिला व माता भगिनी उपस्थित होत्या.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21