Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक महिला दिन साजरा…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
दिनांक ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत,सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी यांनी महिला दिनाचा आगळा वेगळा कार्यक्रम साजरा केला.

यानिमित्ताने डी. फार्मसी व बी. फार्मसी मधील सर्व महिला कर्मचाऱ्यांना गौरवान्वित केले. या कार्यक्रमासाठी बापूसाहेब थिटे कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉक्टर शितल बर्डे प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या. त्यांनी फ्रॉम मॅनेजिंग हाऊसहोल्ड टू लीडिंग नेशन या विषयाला अनुसरून महिलांच्या कर्तबगारीचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडला व हा दिन साजरा करण्यामागचा इतिहास व महत्त्व विशद केले.
आजच्या काळात सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत ,तसेच जेंडर इक्वलिटी आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी ही काळाची गरज आहे असेही सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी बोलताना सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.द्वारकादास बाहेती यांनी आपल्या आईच्या घरच्या व्यवस्थापनापासून ते देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या स्त्रियांचे दाखले देत महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापिका सारिका झाडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव धनंजयजी थिटे, डॉ. हर्षवर्धनजी थिटे यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी बी. फार्मसी व डी. फार्मसी चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 9 3
Users Today : 131
Users Yesterday : 503