Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

भेसळयुक्त पनीरच्या कारखान्यावर छापा गुन्हे शाखा युनिट-6 आणि अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा/प्रतिनिधी(विनायक साबळे )

केमिकलचा वापर करून दूध विरहित कृत्रिम पनीर बनवणाऱ्या मांजरी खुर्द येथील एका शेतातील गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गुन्हे शाखा युनिट ०६ यांनी संयुक्तपणे धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सापडलेले तब्बल दीड हजार किलो भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले असून सुमारे पावणेबारा लाख रुपयांचा भेसळीचा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई गुरुवारी (दि. ६) करण्यात आली. लहान मुलांसह सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळ करणारे कृत्रिम दूध, दही, पनीर आणि तूप अशा अनेक टोळ्या शहर आणि जिल्ह्यात सक्रिय असून, अशा टोळ्यांची काही माहिती मिळाल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांनी अन्न व औषध प्रशासनाला वाघोली येथे भेसळयुक्त व कृत्रिम पनीर बनविण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिस व अन्न व औषध प्रशासन यांनी एकत्र कारवाई करत वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माणिकनगर, मांजरी खुर्द येथे एका शेतामध्ये असलेल्या गोडाऊनमध्ये धाड टाकली.
या ठिकाणी भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम सुरू होते. तेथे गोदाम मालक सोपान साळवे (वय ४५, रा. दुबेनगर, वाघोली, पुणे) यांचे गोदामामध्ये तब्बल १ हजार ४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जीएमएस पावडर, १ हजार ८०० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा एकूण ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या वेळी पंचनामे करून भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 9 2
Users Today : 130
Users Yesterday : 503