सरपंच सौ दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते नवनियुक्त उपसरपंच अमोल शितोळे यांचा सन्मान.

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण फराटा प्रतिनिधी :

शिरुर तालुक्यातील पूर्व भागातील मांडवगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांचे खंदे समर्थक अमोल शितोळे यांची मांडवगण फराटा गावचे उपसरपंचपदी निवड झालेबद्दल त्यांचा सन्मान बाभुळसर बुद्रुक गावचे सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माझी संचालक आत्माराम बापू फराटे ,महेंद्र नागवडे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ,संतोष फराटे युवा उद्योजक,निलेश शितोळे, सोमनाथ नागवडे, माऊली जगताप ,मा व्हा चेअरमन अमोल जगताप, अमित शितोळे, किसन बापू फराटे, दत्तात्रय जगताप, सुदाम जगताप ,मुकेश साठे,बाळासाहेब वाबळे,आदी उपस्थित होते.
सरपंच दीपाली नागवडे यांनी सांगितले की शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली दादा पाटील फराटे,शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी बापू काळे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास करण्यासाठी नवीन पिढीला संधी देण्याचे काम सतत या नेत्यांनी केले आहे .
मांडवगण फराटा गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेता गावातील मुलभूत गरजा, आरोग्य,पाणी,वीज,आणि मुख्य आजूबाजूच्या गावांना जोडणारे रस्ते यांचे चोख नियोजन, अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण , शासनाच्या विविध लाभाच्या योजना मांडवगण फराटा च्या लोकनियुक्त सरपंच समीक्षाताई अक्षय फराटे पाटील यांनी केल्याचे यावेळी सांगितले.
सर्व उपस्थितांचे आभार मुकेश दादा साठे पाटील यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 6 7
Users Today : 1
Users Yesterday : 9