Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल वाटप…..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरुर प्रतिनिधी
बाभुळसर बु ता शिरूर जि पुणे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग यांच्या विद्यमाने पंतप्रधान आवास योजना टप्पा क्रमांक दोन मध्ये ऐकून बारा घरकुल लाभार्थी आदेश वितरण करण्यात आले.हे घरकुल वितरण ग्रामसभेत करण्यात आले.
या ग्रामसभेचे अध्यक्ष आदर्श सरपंच दिपालीताई नागवडे यांच्या हस्ते लाभार्थींना वितरण घरकुल आदेश देण्यात आले.यामध्ये सोमनाथ राजाराम नागवडे, कमल बाळासाहेब नागवडे, इंदुबाई गोकुळ माने,आशा बापू भंडलकर, कुसुम बाळासाहेब भंडलकर,ज्योसना मनोहर नागवडे आदी लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले .

तसेच यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण संपूर्ण राज्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिंक द्वारे दाखवण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये महेंद्र नागवडे मा. उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,माजी सरपंच भाऊसाहेब माने ,अल्लाउद्दीन अलवी सचिव महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद शिरूर तालुका, अशोक राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य, वृक्षमित्र किरण कांबळे, मीना माने ,बायडाबाई चव्हाण ,आशा वर्कर रुकसाना अलवी, राधिका रणदिवे , यु डी गायकवाड अमित नागवडे संगणक परिचालक, सागर नागवडे सहाय्यक क्लार्क, संतोष भंडलकर ग्रामपंचायत शिपाई आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिपाली नागवडे यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब, गृहमंत्री,सहकार मंत्री अमितजी शहासाहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून राज्याचा विकास होत असताना, पंतप्रधान आवास टप्पा क्रमांक दोन मधून जवळपास बारा लाभार्थ्यांना पहिल्यांदाच आमच्या छोट्या गावात मोठ्याप्रमाणावर घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे.

अजून गरजूंना गावामध्ये घरकुल लाभ देऊन प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर देण्याचा येत्या काळात गावांसाठी प्रयत्न केला जाणार आहे.
तसेच गावचा विकास करत असताना शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके ,जिल्हा नियोजन समिती सदस्य रवी बापू काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा पाचर्णे, दादा पाटील फराटे संचालक घोडगंगा कारखाना, एकनाथ शेलार अध्यक्ष युवक भाजपा शिरुर तालुका यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने बाभुळसर बु.गावचा विकास करत असताना गावाला भरीव निधी देऊन गावचा विकास झाला आहे .तसेच पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून बाभुळसर बु ते गणेगाव दुमाला रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत पाच कोटी ३३ लक्ष रुपये मंजुरी देऊन या रस्त्याचे काम जलद गतीने, तसेच उत्कृष्ट दर्जाचा तयार करण्याचे आदेश आमदार माऊली कटके यांनी संबंधित ठेकेदार ढमढेरे यांना दिलेआहेत.
तसेच बाभुळसर बु ते म्हसोबावाडी या रस्त्यालाही भरीव निधी देण्यात येईल व गावचा चेहरा मोहरा बदलण्याचे आश्वासन आमदार माऊली कटके यांनी दिल्याचे यावेळी सरपंच दिपालीताई नागवडे यांनी सांगितले.
तसेच यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन अलवी यांनी केले, तर आभार अमित नागवडे यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 9 3
Users Today : 131
Users Yesterday : 503