Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

ध्येयप्राप्तीसाठी नियोजन महत्त्वाचे :अभिजीत थोरात

Facebook
Twitter
WhatsApp

शिरुर प्रतिनिधी:
मा. पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आमदाबाद येथील शाळेत दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.
सकाळी बरोबर दहा वाजता कैलास सत्यार्थी सोशल फाउंडेशन च्या वतीने शाळेसाठी भेट म्हणून दिलेल्या एलसीडी प्रोजेक्टर ,कंप्यूटर व साऊंड युनिट चे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
त्यानंतर मळगंगा मंदिराशेजारील सामाजिक सभागृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2024- 25 च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ करण्यात आला.मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, माजी जिल्हा परिषद सदस्य, दक्षता समिती अध्यक्षा शोभनाताई पाचंगे होत्या ,तर प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट अभिजीत थोरात हे होते. आमदाबाद चे आदर्श सरपंच प्रकाश थोरात, सरपंच अनिताताई घुले ,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, रमेशराज शास्त्री पातुरकर, अविनाश सोनार, कैलास सत्यार्थी सोशल फाउंडेशनच्या समन्वयक उज्वला इचके मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत साळवे, उपाध्यक्ष दत्तात्रय शेलार, पोलीस पाटील दिलीप साळवे, माजी आदर्श मुख्याध्यापक फक्कडराव थोरात, पालक प्रतिनिधी डॉक्टर संतोष शेळके, चंदू शितोळे, शिवलिंग देव्हाडे, भिवाजी थोरात, फटांगरे साहेब, डॉक्टर पृथ्वीराज थोरात, मंजुश्रीताई थोरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका खोमणे मॅडम, संजना थोरात मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या सर्वांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी आणि मान्यवरांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केली . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.स्वातीताई थोरात मॅडम यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पोटे सर, पोंदे सर, दासीमे सर, सौ कोरडे मॅडम, शिंदे सर, ढेंगळे मॅडम,शरद येवले, महेश कारकुड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी प्रज्ञा इनामदार आणि साक्षी चोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पोटे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वात शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21