Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरुर जिल्हा पुणे येथे निर्भय कन्या अभियान संपन्न…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्भय कन्या अभियान दिनांक २३व २४ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाले.
मुलींच्या सबलीकरण साठी आणि निर्भय बनण्यासाठी आयोजित अभियान मध्ये पोलिस विभागातर्फे पोलिस महिला अधिकारी सौ.भाग्यश्री जाधव यांनी विद्यार्थिनीशी सुसंवाद साधला.दुपारच्या सत्रामध्ये एडवोकेट सीमा काशीकर यांनी विद्यार्थिनींना त्यांच्याविषयी असणारे कायदे समजावून सांगून मुलींनी निर्भय व्हावे, अन्याय सहन करू नये. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ तक्रार दाखल करावी याविषयी मार्गदर्शन केले.

तसेच कराटे प्रशिक्षक शेख सर यांनी प्रशिक्षण घेवून स्वसंरक्षणचे धडे दिले . सदर अभियानात ७५ मुलींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी निशिकांत शिंदे यांनी केले. सदर अभियानसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचारी उपस्थित होते.प्राचार्य डॉ.बाहेती सरांनी सदर अभियानात मार्गदर्शन केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21