शिरुर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील नाव्हरा गावात गेली दहा बारा वर्षे व्यंकटेश पॉलिमर हे वर्क शॉप चालू आहे.
आता पर्यंत काम करताना तीन ते चार लोकांचा हात निकामी झाला आहे. विशेष बाब ही यात एक महिला व एक १९ वर्षाचा मुलगा ही आहे.दोघांचे उजवे हात निकामी झाले आहेत, प्रिया कांबळे म्हणून जी महिला आहे तिला आज पर्यंत कुठला ही मोबदला किव्हा नुकसान भरपाई तर दिली नाही गेली,शिवाय काही ही विचार न करता,तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्या नंतर,ती बेशुद्ध असताना ,तिच्या जवळ घरचे कुणी नातेवाईक नसताना तिचा मनघाटा पासून हात कट करण्यात आला व तिला कायम चा हात गमवावा लागून ही शिल्लक हाताला योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिला आज ही त्रास होत असल्याची माहिती ती पुणे ग्रामीण न्यूज शी बोलताना दिली.
एक कमजोर व गरीब महिला असल्या मुळे आर्थिक सक्षम असणाऱ्या लोकांना ती सामोरी जाऊ शकली नाही, परंतु आपल्याला आता लढायचे आहे , कारण एक हात नसल्याने कोणते ही काम मिळत नाही शिवाय स्वतः च्या कामात ही इतरांची मदत नसेल तर जगणे अशक्य झाले आहे.
https://www.facebook.com/share/v/15wfD7Yhsy/?mibextid=wwXIfr
ती आज पर्यंत दरोदरी न्याय माघण्या साठी फिरत आहे पण काहीच पदरी न पडल्याचे ही तिने सांगितले आहे.
क्रमश:
