शिरुर प्रतिनिधी:भरत चव्हाण
पोलीस दलातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या सेवा कार्य काळानुसार पदोन्नती झालेली आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल एकोणसाठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर ,तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती केलेल्या आहेत.
त्यात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे व नंदकुमार केकाण यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाहून पोलीस उपनिरीक्षक पदावर तर पोलीस हवालदार राजेश माने व लहानू बांगर यांची पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आलेली आहे .
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी याबाबतचे आदेश काढले आहे, तर शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पदोन्नती झालेल्या चौघांचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, रोहिणी सोनावले, राहुल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सोमनाथ कचरे, विजय म्हस्कर यांनी अभिनंदन करून शिक्रापूर पोलीस स्टेशन च्या वतीने व शिक्रापूर ,तळेगाव येथील ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला आहे.
