शिरुर प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या सी आय आय ए फोर इनोवेशन एक्जीबिशन या स्पर्धेमध्ये कादंबरी सावंत, तन्मय ठुबे, अनिशा शिंदे, हिताक्षी यादव या विद्यार्थ्यांच्या संशोधनाची 5 राज्यातून निवड करण्यात आली आहे
या संशोधनाची सुमारे ८०० प्रकल्पामधून निवड करण्यात आली.
या स्पर्धेमध्ये मध्ये सिताबाई थिटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हर्बल सितोपलादी लोझंजेस हे औषध बनवले होते हे औषध अँटिबायोटिकला पर्याय म्हणून काम करते.
हे औषध प्रा. मोनाली परभाने यांच्या मार्गदर्शनाखाली बनवले होते.ऑन्टिबायोटिक रेसिस्टंस हे सध्या जागतिक पातळीवरील प्रश्न झालेला असुन ,त्याला उपाय म्हणून केलेले सौशोधन हे नक्किच कौतुकास्पदः असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रजी थिटे यांनी सांगितले. कोविड नंतर कमी होत चाललेली प्रतिकारशक्ति व जंतुंचा प्रादूर्भाव हा प्रश्न सोडविण्यासाठी संस्था असे संशोधन करत असते व त्यासाठी लागणारे सामग्रीचा कॉलेजस्तरावर सर्व सुविधा उपलब्ध केले. संशोधनाची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे, संचालक डॉ हर्षवर्धन थिटे यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक प्रा. मोनाली परभणे यांचे अभिनंदन केले.
