कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) पंढरीनाथ नगर येथील पत्रकार क्षेत्रात गेले सात वर्षांपासून कार्यरत असणारे दैनिक पुढारी चे पत्रकार शंकर रमेश पाबळे यांची नुकतीच राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे विभागीय संपर्क प्रमुख पदी निवड झाली असून निवडीचे पत्र त्यांना राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वेळी संघटनेतील पदाधिकारी व जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
शंकर पाबळे यांनी आपल्या लेखनिमधून अनेक सामाजिक समस्या उघड करून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
