Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

मंगळवेढ्याचा सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर व प्रेरणा प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा संभाजी सलगर पुरस्कृत ज्ञानोबा सलगर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहास मिळाला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या शुभहस्ते, परिषदेचे अध्यक्ष प्रकाश जडे व कार्याध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून या काव्यसंग्रहास 2023 सालचा हा चौथा पुरस्कार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर आणि प्रेरणा प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यास राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवेशिका आल्या होत्या. बालसाहित्य विभागात पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांच्या मामाच्या मळ्यात
या कवितासंग्रहाला प्रथम क्रमांक मिळाला असून परिषदेच्या वतीने देण्यात येणारा संभाजी सलगर पुरस्कृत ज्ञानोबा सलगर स्मृती पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या शुभहस्ते, परिषदेचे अध्यक्ष प्रकाश जडे व कार्याध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीकांत पाटील, धनंजय पाटील, डॉ. महेश खरात आदी साहित्यिक उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉ. दत्ता सरगर यांच्या अध्यक्षतेखाली रेखा जडे व प्रा. विश्वनाथ ढेपे यांनी काम पाहिले.सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहास 2023 सालचा हा चौथा पुरस्कार असून याआधी चंद्रपूर येथील कवितेचे घर यांच्या वतीने बापूरावजी पेटकर बालकाव्य पुरस्कार, ऍक्टिव्ह टीचर सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार आणि साहित्य सेवा प्रज्ञा मंच यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार असे प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुरस्कार या काव्यसंग्रहास मिळाले आहेत. या काव्यसंग्रहासाठी 2023 सालचा हा मानाचा चौथा सन्मान असून या काव्यसंग्रहास निवड समितीने प्रथम क्रमांक जाहीर केला आहे.मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहात लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कविता असून त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा प्रेरक कवितांचा समावेश आहे. लहान बाल चमुंसाठी संस्काराची शिदोरी म्हणजे सचिन बेंडभर यांचा मामाच्या मळ्यात हा काव्यसंग्रह! दिलिपराज प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार सागर नेने यांनी विषयाला अनुरूप चित्रे व आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. सचिन बेंडभर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 9 3
Users Today : 131
Users Yesterday : 503