Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधत,प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :
दि.२० ता.शिरूर जि पुणे येथे आपले सरवांचे लाडके,देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधत,संपूर्ण भारत देशातून एकाच वेळी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे प्रमाणपत्र, घरकुल चावी ताबा देण्यात आले.
बाभुळसर बुद्रुक गावचे सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी ही आपल्या ग्रामपंचायत मध्ये ही प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत बधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण स्वतः च्या हस्ते चावी देत केले.
यावेळी उपसरपंच मोहिनी रणदिवे , मनीषा नागवडे ग्रामपंचायत सदस्या, पोलीस पाटील मीना पाडळे ,रमेश पाटोळे मा संचालक,युवा नेते महेंद्र नागवडे,महादेव मचाले, अल्लदिन अल्वी मा.व्हा.चेअरमन संत तुकाराम सोसायटी,सोमनाथ रणदिवे, दत्तात्रय रणदिवे, संतोष चव्हाण ,अमित नागवडे संगणक परिचारक, शिपाई संतोष भंडलकर आदी उपस्थित होते .यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सरपंच दिपाली नागवडे यांनी सांगितले की प्रधानमंत्री घरकुल आवास योजनामुळे लाभार्थ्यांना चांगल्या प्रकारचे घरे मिळू लागल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे .यावेळी दत्तात्रय रणदिवे, सोमनाथ रणदिवे आणि संतोष चव्हाण यांना प्रमाणपत्र, घरकुल आवास योजनेची चावी देऊन ताबा देण्यात आला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 0 2
Users Today : 10
Users Yesterday : 21