Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

गोरक काळे यांना नेशन बिल्डर अवार्ड जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी
वाबळेवाडी शाळेतील शिक्षक गोरक काळे यांना रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचा नेशन बिल्डर अवार्ड नुकताच जाहीर झाला. शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती रोटरी क्लब शिक्रापूरचे संस्थापक विरधवल करंजे, अध्यक्ष विठ्ठल वाघ, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर यांनी नुकतीच दिली.
रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर एक सामाजिक कार्यकरणारी संस्था आहे. समाजात उत्कृष्ट सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचे काम ही संस्था करत असते. दरवर्षी सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधून ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाधिकऱ्यांच्या हस्ते नेशन बिल्डर अवार्ड देऊन सन्मानित करते. यावर्षीही संस्थेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडी येथील गोरक काळे यांना रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचा नेशन बिल्डर अवार्ड जाहीर झाल्याची माहिती रोटरी क्लब शिक्रापूरचे संस्थापक विरधवल करंजे, अध्यक्ष विठ्ठल वाघ, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर यांनी नुकतीच दिली. त्याचे अधिकृत पत्र नुकतेच त्यांनी काळे यांना दिले आहे.
वाबळेवाडी शाळेत गोरक काळे गुरुजींना नेशन बिल्डर अवार्ड जाहीर झाल्याचे कळताच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी शाळेतील मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. वाबळेवाडी शाळेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. त्यांना पुरस्कार जाहीर होताच शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
नेशन बिल्डर अवार्ड म्हणजे एक प्रकारे जबाबदारी. येथून पुढील काळात विद्यार्थी आणि शाळेसाठी अशाच प्रकारचे काम करून शाळेच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी प्रयत्न करीन. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेवून आपल्या सर्वांच्या सहकार्याने शाळा प्रगतीपथावर नेण्याचे काम करत राहील, असे मत यावेळी सत्कारमूर्ती काळे यांनी व्यक्त केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21