Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शालेय सहलींमुळे गजबजला पिंपरी दुमाला परिसर

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
पांडवकालीन शिव मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या देवभूमी श्री क्षेत्र पिंपरी दुमाला येथील श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त रांजणगाव गणपती पंचक्रोशीतील अनेक शाळांनी परिसर सहली आयोजित केल्या होत्या.
गावाचा संपूर्ण परिसर शेकडो विद्यार्थ्यांमुळे गजबजुन गेला होता. निसर्गाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे व टुमदार असे पिंपरी दुमाला गाव फळबागांसाठी प्रसिद्ध आहे .
यावर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे येथील डोंगररांगावरील निसर्ग सौंदर्य अधिकच बहरले आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात येथे हजारो शिवभक्त दर्शनासाठी येतात.
विशेषतः परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा श्रावणी सोमवार यात्रेचे निमित्त साधून येथे सहली घेऊन येतात. श्री सोमेश्वर व श्री रामेश्वर मंदिरांमधील शिवलिंगाचे दर्शन करून हे विद्यार्थी संपूर्ण दिवस येथे रमून जातात.
याप्रसंगी श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गावातील व परिसरातील दानशूर व्यक्ती दर्शनासाठी आलेल्या सर्व विद्यार्थी व भाविकांना अन्नदानाचे आयोजन करतात.
मंदिर परिसरातील विशाल वटवृक्षाच्या पारंब्यावर झोके घेत व यात्रेतील खेळण्यांचा आनंद लुटत सहलीचा दिवस कधी संपला हे विद्यार्थ्यांच्याही लक्षात आले नाही.
विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी उत्तम नियोजन व भोजन व्यवस्था केल्याबद्दल केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे व मुख्याध्यापक राहुल चातुर यांनी श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट पिंपरी दुमाला यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी देवस्थानचे पदाधिकारी सुनील सोनवणे,शेखर पाटेकर, कैलास पिंगळे,अभिषेक शेळके,श्रीकांत सोनवणे,अरुण कळसकर,कैलास बडदे इ. उपस्थित होते.मनात रेंगाळणाऱ्या सुंदर आठवणी सोबत घेऊन विद्यार्थी आपापल्या गावी रवाना झाले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 0 2
Users Today : 10
Users Yesterday : 21