रामगिरी महाराज यांना त्वरीत अटक करावे…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
दि.२३/०८/२०२४ रोजी शिरूर शहरांमधील असंख्य मुस्लिम बांधवांनी रामगिरी महाराज यांचा शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला.

मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी रामगिरी महाराज यांनी अपशब्द बोलल्या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात यावी.
तथाकतीत सुरेश रामकृष्ण राणे उर्फ रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब आणि इस्लाम धर्मा बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे व आक्षेपार्ह टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे, भारतात नव्हे तर जगभरातील मुस्लिम समाजात संताप वाढत आहे.
त्यामुळे ठीक ठिकाणी आंदोलने होत आहेत , म्हणून त्यांच्यावर कलम ३०२ व इतर कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.
अशा आक्षेपार्ह विधान बाबत सदर मानवास कसलीही खंत ही नाही, हे दुर्दैवच.
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, स्वतःच्या वक्तव्यावर ते ठाम आहे व कायद्याने जे काही करता येईल ते करण्याचे साक्षात्कार ते देत असल्याने, सर्व मुस्लिम व इतर शांतीप्रिय समाज यांच्यामध्ये रामगिरी महाराज यांच्या विषयी प्रचंड राग निर्माण झालेला आहे .
जगातील कोणताही मुस्लिम मोहम्मद पैगंबर साहेबां विषयी एक अपशब्द कदापि सहन करणार नाही .या विषयी सर्व काही माहिती असताना देखील जाणून बुजून अशा प्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य करणे म्हणजेच विशिष्ट समाजास चिथावणी देणे व दोन समाजात तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे होय, असे केल्या प्रकरणी रामगिरी महाराज यांना त्वरित अटक करण्यात येऊन, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शिरूर शहर मोहरम कमिटी, हुसेनी ग्रुप, अल फतेह यंग सर्कल, ए .के. बॉईज ग्रुप, के. जी. एन. ग्रुप , इस्लामपुरा यंग सर्कल ,
मोहर्रम कमेटी शिरूर शहर चे अध्यक्ष फ़ैयाज़ सौदागर, उपाध्यक्ष इमरान शेख, मोनिब शेख, समीर खान, बादशाह सौदागर अकबर अत्तार, आरिफ सैय्यद, नज़ीर शाह, नसिम काज़ी, सादिक शेख, एजाज सौदागर, आदिल शाह, फैज़ान शेख, इन्नुस पठान ,लइक शाह, रज्जाक शेख ,जफर सैय्यद, शाहेद सौदागर, रज्जाक खान
व मोहर्रम कमेटी शिरूर शहर चे सर्व मेंबर आणि सभासद शिरूर शहराचे मुस्लिम समाजाचे मित्र बंधु उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 0
Users Today : 4
Users Yesterday : 9