Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

मिना म्हसे यांना साहित्यिक शिक्षक गौरव पुरस्कार

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी
जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका, औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका व शिष्यवृत्ती तज्ञ मिना म्हसे यांना साहित्यिक शिक्षक गौरव पुरस्कार प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जगतापवाडी शाळेच्या आदर्श शिक्षिका, शिष्यवृत्ती तज्ञ व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मिना म्हसे यांना साहित्यिक शिक्षक पुरस्कार कवी हनुमंत चांदगुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गीतकार व कवी हनुमंत चांदगुडे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव भोंडवे , गुलाबराव गवळे, तुकाराम बेनके, मारुती कदम, मयूर करंजे, जेष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे, अनिल पलांडे, संजय धुमाळ,
हे उपस्थित होते.
यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत मसापचे अध्यक्ष मनोहर परदेशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कुंडलिक कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेंडभर यांनी केले. व आभार प्रा. गुरुनाथ पाटील यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21