प्रतिनिधी : दत्तात्रय हिरामन कर्डिले
विद्याभारती शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर संचालित,
श्री.डि.एन ताठे माध्यमिक विद्यालय कारेगाव मध्ये शासन परिपत्रकानुसार ,शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे मार्फत दि.22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 अखेर शिक्षण सप्ताह कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघमारे तुकाराम यांनी दिली.
या सप्ताहामधे विविध उपक्रम राबविण्यात आले,जसे की पाणी समस्या,प्रदुषण समस्या या विषयी जनजागृती करण्यात आली.
तसेच विद्यार्थी वर्गाने अतिशय उत्साहाने सांस्कृतिक कार्यक्रमा मधेही सहभाग घेऊन, सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी विविध नाटिका सादर केल्या.
विद्यालयात स्थापन झालेल्या इको क्लबच्या सहाय्याने वृक्षारोपण करण्यात आले.
क्रिडादिन हा विविध प्रकारचे खेळ खेळून साजरा करण्यात आला.
वाचन दिनाची सुरुवात विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका श्रीमती.कर्पे मॅडम यांनी निपुण प्रतिज्ञा करुन विद्यार्थी वर्गाने गोष्टिच्या रूपाने अवांतर वाचन केले.
सर्व विद्यार्थी यांना पोषण आहार निमित्ताने शाळेतील परसबागेतील भाज्या वापरून स्वादिष्ट सांबर भाताचे आयोजन करण्यात आले व त्याचा सर्व आर्थिक भार विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघमारे तसेच जेष्ठ शिक्षक सातपुते व नुकतेच निवृत्त झालेले विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक थोरात यांनी उचलला.
त्या कार्यक्रमाला शालेय पोषण आहार समितीचे अध्यक्ष पोपटराव नवले यांची उपस्थिति लाभली.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात उद्योगपती जयप्रकाश नवले यांची विशेष उपस्थिति लाभली.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेचे सचिव जयवंत सरोदे, अध्यक्ष गुलाबराव नवले पाटिल,शाळाव्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष तुषार कोहकडे तसेच, सदस्य नागेश शेलार,अजित कोहकडे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष आनंद उघडे,पालक प्रतिनिधि दिलावर शेख या सर्वानी उपस्थिति दर्शविली.
सदर शिक्षण सप्ताह उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक कर्डिले ,श्री. जाधव मॅडम,श्री.धावड़े मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यांना सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची साथ लाभली.असे विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीम.झावरे विमल यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेऊन सर्वांचे कौतुक करण्यासाठी कारेगाव चे प्रथम नागरिक सौ. निर्मला नवले यांनीही आपला बहुमूल्य वेळ दिला.
शेवट सर्वांचे आभार विद्यालयातील जेष्ठ शिक्षक खंदारे सर यांनी मानले.
