शिरूर नगरपालिका निवडणुकीत भाजप ताकद पुन्हा दाखवणार?

Facebook
Twitter
WhatsApp

[शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवारीसाठी अनेकांची मोर्चे बांधणी
प्रभाग क्र. ८ मधून उमेदवारीची तयारी – भाजपा उद्योग आघाडीचे संजय पाचंगे]

शिरूर – आगामी शिरूर नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून, प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) यंदाची निवडणूक निर्णायक ठरणार आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता. तरीदेखील, भाजपने शहरात आपली संघटनात्मक ताकद कायम राखली आहे. यावेळी भाजपला नगरपरिषदेत सत्ता मिळविण्याची चांगली संधी असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

भाजपा उद्योग आघाडीचे संजय पाचंगे यांनी सांगितले की, “शिरूर नगरपरिषदेत भाजपची मजबूत संघटना आहे. पक्षाने आदेश दिल्यास मी प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढविण्यास तयार आहे. भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिरूरच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे.”

दरम्यान, शिरूर शहरात शिरूर शहर विकास आघाडी आणि महायुती यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील यशामागे भाजपाचे मोठे योगदान राहिले असून, यावेळी नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने शिरूरमध्ये प्रचंड चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध उद्योगपती आणि शिरूर शहर विकास आघाडीचे नेते प्रकाश धारिवाल यांच्याभोवती अनेक इच्छुक उमेदवार मोर्चेबांधणी करत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून शिरूर शहर विकास आघाडीची नगरपरिषदेत सत्ता असून, धारिवाल यांचा प्रभाव आजही कायम,
भाजपकडेही प्रबळ संघटन आणि कार्यकर्त्यांचा विश्वास असल्याने या वेळेस भाजप शिरूर नगरपरिषदेवर भगवा फडकवेल, अशी आशा भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 5 5 2 9 6
Users Today : 4
Users Yesterday : 22