[प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल महायुतीच्या व्यासपीठावर
शिरूर नगरपालिका निवडणुकीसाठी धारीवाल यांनी स्पष्ट केली आपली भूमिका]
शिरूर प्रतिनिधी :
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. शिरूर शहरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तब्बल वीस कोटीहून अधिक रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले.
या कार्यक्रमांमुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, शिरूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने “शिरूर शहर विकास आघाडी” या आघाडीतील घडामोडींना विशेष वेग आला आहे.
उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी या प्रसंगी बोलताना स्पष्ट केले :
शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांबरोबर काम करणार आहे. जो शिरूरचा विकास करेल, त्याच्याबरोबर मी उभा राहीन.
त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे शिरूर शहरातील राजकीय इच्छुकांचे लक्ष आता “शहर विकास आघाडी”कडे वेधले गेले आहे. धारीवाल यांच्या नेतृत्वाखालील गट आगामी नगरपालिका निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी तिकीट वाटपावरून रस्सीखेच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. शिरूर तालुक्यातील प्रमुख नेत्यांमध्ये मतदारसंघनिहाय जागावाटपाबाबत चर्चांना जोर आला आहे.
एकूणच, विकासकामांच्या भूमिपूजनासह आगामी निवडणुका आणि राजकीय समीकरणांमुळे शिरूर तालुक्यातील राजकारणाचे तापमान चांगलेच वाढले आहे.
पाच कंदील चौकात संध्याकाळी सभेच्या दरम्यान माझी खा.आढळराव पाटील,प्रकाश धाडीवाल, जाकीरखान पठान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना. शिरूर नगरपालिका कामा विषयी देत,भविष्यात होणाऱ्या सुधारणा व कामांची माहिती दिली.
यावेळी शिरूर हवेली चे आमदार माऊली आबा कटके, शिरूर नगरीचे नेते प्रकाश धाडीवाल, आढळराव पाटील, रविबापु काळे,राजेंद्र गावडे, जाकीरखान पठाण,शरद कालेवर श्रुतिका झांबरे,प्रिया बिराजदार,एजाज बागवान,सुनील जाधव,उमेश जाधव,मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. आभार नगरसेवक विनोद भालेराव यांनी मानले.
