[शिरूर येथे पाथफाईंडर फाउंडेशन चे अध्यक्ष, मनसे जिल्हाध्यक्ष ऍड.स्वप्निल भैय्या माळवे यांनी आयोजित केलेल्या “जलसा द नवरात्र उत्सव” (फेस्टिवल) 2025 या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाचे दानशूर उद्योगपती, शिरूर नगरीचे सभागृह नेते, मा.नगराध्यक्ष प्रकाश भाऊ रसिकलाल धारीवाल” यांनी गरबा दांडिया चा धरला ठेका.]
शिरूर प्रतिनिधी:
शिरूर येथे नवरात्र उत्सव च्या निमित्ताने पाथफाईंडर फाउंडेशन आणि ओरटेक्स डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय जलसा द नवरात्र उत्सव या कार्यक्रमाला शिरूर नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रकाश शेठ रसिकलाल धारीवाल यांच्यासह, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेवक पैलवान अशोकदादा पवार, मुजफ्फर कुरेशी, निलेश गाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्रजी गावडे, निलेश गाडेकर, हाफिज बागवान, किरण पठारे व आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमाचे आयोजक मनसे जिल्हाध्यक्ष ऍड.स्वप्नीलभैया माळवे यांच्या नेतृत्वाखाली ओरटेक्स डान्स अकॅडमी चे सर्वेसर्वा मोनिका अनिल कांबळे,ओमकार आढाव, त्याचबरोबर आयोजक श्याम पवार, चंद्रकांत जाधव, नकुल पवार, परेश सुपते, नेहा धन्नी, विकास बोरुडे, संजय घेगडे, ओमकार कावळे, आकांक्षा वळे, दिया करंजुले, मिलिंद परदेशी, अविनाश कारले, आयाज शेख, खुशी बोरा व आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रकाशशेठ धारीवाल यांच्या समवेत आदी मान्यवरांनी देखील ठेका धरला.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक म्हणून *डान्स महाराष्ट्र डान्स विजेते प्रथमेश माने* यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परीक्षक म्हणून डॉ.नारायण घनगावकर सर व कानिफनाथ फुलमाळी यांनी कामकाज पाहिले.
