Breaking News
वर्तमानातील नाही तर, भविष्यातील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचा विचार! हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची मागणी – विद्यमान आमदार माऊली आबा कटके. दिपीका परदेशीची राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड! श्री वाघेश्वर विद्याधामच्या शिरपेचात मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रात प्रशालेची यशस्वी घोडदौड कायम नागरिकांच्या मागणीनंतर शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या सूचनेनुसार घोड उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू; १५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात! गरजू रुग्णांच्या मदतीसाठी उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनचा माणुसकीचा हात! बाभुळसरच्या सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांची बायोगॅस क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी; महामहिम राज्यपालांच्या हस्ते ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ प्रदान! वैचारिक मतभेद बाजूला ठेवत सण-उत्सवांतून एकोप्याचा संदेश देणारे आदर्श गाव कानगाव!

वर्तमानातील नाही तर, भविष्यातील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचा विचार! हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची मागणी – विद्यमान आमदार माऊली आबा कटके.

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी. संतोष साळुंके.

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील हवेली तालुक्याचे झपाट्याने होणारे नागरीकरण, वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन मुळशी विभागाचे विभाजन करून स्वतंत्र ‘हवेली वीज वितरण विभाग’ निर्माण करण्यात यावा, अशी मागणी शिरूर हवेलीचे कार्यक्षम विद्यमान आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार कटके यांनी महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र वीज वितरण विभाग निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करून, त्याचा प्रस्ताव तयार करावा आणि पुढील मंजुरीसाठी महावितरणच्या मुख्य कार्यालय, प्रकाशगड (मुंबई) येथे तातडीने पाठवावा, अशी मागणी त्यांनी मुख्य अभियंत्यांकडे केली.

यासोबतच लोणी काळभोर येथील EHV उपकेंद्राचे काम पूर्ण करणे, वाघोली परिसरातील प्रस्तावित दोन EHV उपकेंद्रांची उभारणी, शिंदवणे सबस्टेशन कार्यान्वित करणे, पेरणे सबस्टेशनचे काम पूर्ण करणे, तसेच नवीन कोरेगाव (कोरेगाव मूळ) आणि उरुळी कांचन येथे नवीन सबस्टेशन व फीडर्स उभारण्याची मागणीही त्यांनी केली.

तसेच शासनाच्या सौर ऊर्जा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांना मिळावा, प्रलंबित वीज जोडण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आमदार माऊली आबा कटके म्हणाले की, “हवेली तालुक्याचा झपाट्याने विस्तार होत असून आगामी काळात लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्र आणि गृहप्रकल्पांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळेजे केवळ आजच्या विजेच्या गरजांचा विचार करून चालणार नाही, तर पुढील २५ वर्षांचे नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, तसेच भविष्यात पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र हवेली वीज वितरण विभागाची मागणी केली आहे.”

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 8 2 8 5
Users Today : 1
Users Yesterday : 37