Breaking News
मांडवगण फराटा येथे श्री वाघेश्वर कांस्यथाळी थेरपी अँड वेलनेस सेंटरचे दिमाखात उद्घाटन…. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अखिलेश राजुरकर सर यांच्या हस्ते उद्घाटन; परिसरातील नागरिकांना निसर्गोपचाराचा लाभ मिळणार आहे… सिस-पे घोटाळ्यात तळेगाव ढमढेरे येथील तलाठी दशरथ रोडे ला अटक … ११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला मंजुरी, आणखी ६० कोटींचा प्रस्ताव सादर वाहन चालवताना मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण! रामलिंग रोड ला नर बळीचा संशय? बाभूळसर बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र नागवडे यांचे अपघाती निधन काष्टी-दौंड रस्त्यावरील अपघातात मृत्यू; परिसरात शोककळा “इसार पावती (साठेखत) करून दिली… पण आता खरेदीखत (Sale Deed) करून देण्यास नकार देतोय??”

मांडवगण फराटा येथे श्री वाघेश्वर कांस्यथाळी थेरपी अँड वेलनेस सेंटरचे दिमाखात उद्घाटन…. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अखिलेश राजुरकर सर यांच्या हस्ते उद्घाटन; परिसरातील नागरिकांना निसर्गोपचाराचा लाभ मिळणार आहे…

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण फराटा संतोष साळुंखे : मांडवगण फराटा येथे नारायण[काका] परदेशी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अनुराधा परदेशी आणि कु ऋत्विक परदेशी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या श्री वाघेश्वर कांस्यथाळी थेरपी अँड वेलनेस सेंटरचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अखिलेश राजुरकर सर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यामुळे परिसरात आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता ताण, बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या विविध समस्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक उपचारपद्धती, कांस्यथाळीच्या साहाय्याने केली जाणारी थेरपी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या वेलनेस सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे.

या सेंटरमुळे मांडवगण फराटा आणि परिसरातील नागरिकांना आरोग्य व वेलनेसविषयक सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

उद्घाटनप्रसंगी डॉ. अखिलेश राजुरकर सर यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाबद्दल श्री नारायण[काका] परदेशी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अनुराधा परदेशी आणि ऋत्विक परदेशी यांचे कौतुक करण्यात आले. आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे आणि नागरिकांना निरोगी जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे, या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

श्री वाघेश्वर कांस्यथाळी थेरपी अँड वेलनेस सेंटरच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होऊन त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी श्री गणेशा मल्टीस्पेशालिटी चे सर्वेसर्वा डॉ.अखिलेश राजुरकर सरांनी व्यक्त केला.


यामध्ये नागरिकांना फूट मसाज,ट्रेड मिल,मसाज चेअर, क्रेझी फिट व्हायब्रेशन प्लेट, आधुनिक इ.एम.एस.[EMS] मसाज मशीन, गुढग्याचे मशिन,हाताच्या पंजाचे मशिन अशा नवीन तंत्रज्ञानाने युक्त निसर्गोपचार पद्धतीने लाभ घेता येणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी राजकीय ,सामाजिक,वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 5 6 6 8
Users Today : 231
Users Yesterday : 79