मांडवगण फराटा,
प्रतिनिधी. संतोष साळुंके
गणेगाव दुमाला : गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोसायटीचे चेअरमन नवनाथ नांदखिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सोसायटीच्या विविध कामकाजावर चर्चा करण्यात आली.

सर्वप्रथम स्वर्गीय अजित दादा पवार यांना आणि मयत सभासद यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून .सभेस सुरुवात करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासदांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली. सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांसह विविध विषयांवर सभासदांनी चर्चा केली. संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भातही उपस्थितांनी आपली मते मांडली.
यावेळी सभासदांनी संस्थेच्या कामकाजाबाबत सकारात्मक सूचना केल्या. सर्व विषयांवर चर्चा करून सभेतील कामकाज शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पूर्ण करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना चेअरमन नवनाथ नांदखिले यांनी सोसायटीच्या प्रगतीसाठी सभासदांचे सहकार्य आणि सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या हितासाठी सातत्याने काम करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सोसायटीचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.





Users Today : 31
Users Yesterday : 693