रांजणगाव सांडस परिसरात विजेचा लपंडाव; शेतकरी संतप्त

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी .संतोष साळुंके

लोडशेडिंग असतानाही वीजपुरवठ्यात वारंवार खंड; सुरळीत वीजपुरवठ्याची शिवसेना तालुका प्रमुख राहुल दादा रणदिवे यांची मागणी

रांजणगाव सांडस परिसरातील वाड्या-वस्त्यांवर सध्या लोडशेडिंग सुरू असतानाच वारंवार वीज ये-जा करत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. लोडशेडिंगचे नियोजन असतानाही विजेचा सुरू असलेला हा लपंडाव नागरिकांच्या अडचणीत आणखी भर घालत आहे.

शेतीच्या कामांसाठी वीज अत्यंत महत्त्वाची असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पिकांना पाणी देणे, कृषीपंप चालविणे तसेच दैनंदिन कामकाजावरही याचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख राहुल दादा रणदिवे यांनी महावितरण प्रशासनाने रांजणगाव सांडस परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील वीजपुरवठ्याची तातडीने दखल घ्यावी, अनावश्यक वीजखंडित होणे थांबवावे आणि शेतकरी व ग्रामस्थांना सुरळीत व नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.

“लोडशेडिंगचा त्रास नागरिक सहन करत असतानाही त्यात वारंवार वीज ये-जा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा,” अशी मागणी राहुल दादा रणदिवे यांनी केली आहे.

वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 0 4 9 3
Users Today : 3
Users Yesterday : 85