शिरूर प्रतिनिधी साहेबराव चव्हाण
मराठी चित्रपटसृष्टीत नव्या दमाचा दिग्दर्शक म्हणून रविराज वाव्होळे आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रविराज वाव्होळे दिग्दर्शित आणि सागर भंडारे निर्मित ‘धप्पा’ हा मराठी चित्रपट ९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रविराज वाव्होळे यांनी अनेक वर्षांच्या संघर्षातून आणि मेहनतीतून मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी ‘धप्पा’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटाचा प्रवास रविराज यांच्यासाठी तितकासा सोपा नव्हता. कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी आपल्या स्वप्नांची साथ सोडली नाही. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हा चित्रपट पूर्णत्वास नेला. त्यामुळे ‘धप्पा’ हा केवळ एक चित्रपट नसून त्यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि मेहनतीची कहाणी असल्याचंही म्हटलं जात आहे.
या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते सागर भंडारे यांनी सांभाळली असून, रविराज वाव्होळे यांच्या दिग्दर्शनातून एक नवी कथा आणि नवा दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर येणार आहे.

“परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मोठं असेल तर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ते पूर्ण करता येतं,” असा विश्वास रविराज वाव्होळे यांच्या या प्रवासातून दिसून येतो.
प्रेम, भावना आणि आयुष्याशी जोडलेल्या अनुभवांची कथा मांडणारा ‘धप्पा’ प्रेक्षकांना कितपत भावतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.





Users Today : 1
Users Yesterday : 154