Breaking News
संग्राम हॉटेलसमोर कंटेनरची कारला धडक; त्यानंतर शिवाई बसही धडकली … मोटारसायकलस्वाराचाही दुर्दैवी अंत राष्ट्रीय युद्धकला स्पर्धेत राजमाता जिजाऊ आखाड्याचा डंका! आपटीच्या बेपत्ता महिलेचा पाच दिवसांनी भीमा नदीत मृतदेह दहा महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून झाली होती बेपत्ता; ड्रोनसह अग्निशमन दल, आपदामित्रांच्या मदतीने शोधमोहीम आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकांमध्ये विविध उपक्रमांनी क्रांतिकारकांना अभिवादन सणसवाडीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन जिवंत काडतुसे, स्विफ्ट कारसह ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त.. शिरूर सतरा कमानी पुलावरून घोडनदीत उडी मारणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडला आणि ओळख पटली

संग्राम हॉटेलसमोर कंटेनरची कारला धडक; त्यानंतर शिवाई बसही धडकली … मोटारसायकलस्वाराचाही दुर्दैवी अंत

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर बायपासवरील संग्राम हॉटेलसमोर आज मंगळवार दि.११/०८/२०२६ रोजी संध्याकाळी ५च्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात वाडेगव्हाण येथील उद्योजक तथा सरपंच किशोर यादव यांच्यासह मोटारसायकलस्वार प्रथमेश प्रकाश लाड रा. कुंडल ता. पलूस जि. सांगली यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरूर बायपासवरील संग्राम हॉटेलसमोर किशोर यादव हे इंडेवर कार मधून प्रवास करीत होते. यावेळी एका कंटेनरने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली,त्यानंतर पुणे-नगर मार्गावर धावणाऱ्या शिवाई बस (MH-49-BZ-8060) नेही अपघातग्रस्त कारला धडक दिली.

या भीषण अपघातात कारमधून प्रवास करणारे वाडेगव्हाणचे उद्योजक तथा सरपंच किशोर यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच डिव्हायडर पास करून दुसऱ्या रोड वर जाण्या साठी थांबलेल्या मोटारसायकलस्वार प्रथमेश प्रकाश लाड यांचाही अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अपघाताची नेमकी कारणे तसेच घटनेची सविस्तर माहिती तपासानंतर स्पष्ट होतील.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 8 3 7 7
Users Today : 233
Users Yesterday : 787