मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके
दिनांक ९ ऑगस्ट रोजी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकांमध्ये विविध उपक्रमांनी क्रांती दिन साजरा करण्यात आला. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक मामलेदार कचेरी पुणे येथे दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन वेगवेगळ्या संस्थांमार्फत करण्यात आले होते.
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास मा. अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व राष्ट्रगीताचे गायन करून मानवंदना देण्यात आली. त्याचबरोबर स्मारक परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पुतळ्यास पुष्प अर्पण करून मानवंदना देण्यात आली.तसेच शब्दधन काव्य मंच यांच्यावतीने क्रांती दिनानिमित्त ऐतिहासिक काव्य वाचन संमेलन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संदीप तापकीर (ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास अभ्यासक),शिवाजीराव शिर्के (ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास संशोधक) उपस्थित होते.

तसेच सायंकाळी इतिहास प्रेमी मंडळ पुणे यांचे वतीने क्रांतिकारकांना मानवंदना देण्यासाठी मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

त्याची सुरुवात आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक ते समारोप हुतात्मा नारायण दाभाडे स्मारक या ठिकाणी, या कार्यक्रमाचे नियोजन इतिहास प्रेमी मंडळी व इतिहास तज्ञ प्रा. मोहन शेटे सर व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने करण्यात आले. तसेच दिवसभरामध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक या ठिकाणी अनेक इतिहास प्रेमी,शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनी व समाजातील विविध स्तरातील नागरिक बंधू भगिनी यांनी उपस्थित राहून सर्व क्रांतिकारकांना अभिवादन केले.






Users Today : 43
Users Yesterday : 877