Breaking News

सणसवाडीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन जिवंत काडतुसे, स्विफ्ट कारसह ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त..

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी:विनायक साबळे

सणसवाडी (ता. शिरूर) येथे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या ३२ वर्षीय तरुणास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. धनंजय आकाश धुणगव (वय ३२, रा. आदर्शनगर, सर्व्हे नं. ७२, दत्त कॉलनी, दिघी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि लाल रंगाची स्विफ्ट कार असा एकूण ४ लाख ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रविवारी (९ ऑगस्ट) शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत सणसवाडी येथील अंबिका कला केंद्रासमोर, नगर-पुणे रस्त्यावर एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन उभी असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीची पोलिसांनी खातरजमा केली. त्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून संशयित धनंजय धुणगव याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच तो वापरत असलेली लाल रंगाची स्विफ्ट कारही पोलिसांनी ताब्यात घेतली.

या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जप्त केलेल्या शस्त्राचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात येणार होता, तसेच आरोपीकडे हे पिस्तूल आणि काडतुसे कोठून आली, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

याप्रकरणी पोलिस हवालदार विकास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय धुणगव याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलिस फौजदार संजय पड्याळ, पोलिस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील तसेच पोलिस अंमलदार सागर धुमाळ यांनी सहभाग घेतला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 7 3 1 5
Users Today : 43
Users Yesterday : 877