डॉक्टर्स डे निमित्त बकोरी येथे १०० वृक्षांचे वृक्षारोपण

Facebook
Twitter
WhatsApp

वाघोली:प्रतिनिधी.विनायक साबळे

वाघोली:आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे चे औचित्य साधून असोसिएटेड डॉक्टर्स ग्रुप व हवेली तालुका डॉक्टर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, मणिपाल हॉस्पिटलच्या प्रायोजकत्वाखाली बकोरी येथील देवराई वनराई प्रकल्पात रविवारी वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले. या उपक्रमात सुमारे ७० डॉक्टरांनी सहभाग घेत १०० वृक्षांची लागवड केली.

“एक डॉक्टर – पाच झाडे” या संकल्पनेवर आधारित या अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी आपले प्रिय गुरुवर्य कै. डॉ. चंद्रकांत गंगाराम कोलते यांच्या नम्र स्मृतीप्रित्यर्थ अर्जुन वृक्षाचे रोपण करून त्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमास बकोरी देवराई वनराई प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख मा. चंद्रकांत दादा वारघडे यांचे विशेष सहकार्य लाभले. वृक्षारोपणानंतर सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी डॉ. मच्छिंद्र काशिद म्हणाले, “असोसिएटेड डॉक्टर्स ग्रुप आणि हवेली तालुका डॉक्टर्स ग्रुपच्या माध्यमातून डॉक्टर्स डे निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे आरोग्य तपासणी शिबिरानंतरचा दुसरा उपक्रम म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण अभियान.आज ७० डॉक्टरांनी एकत्र येऊन १०० वृक्षांचे वृक्षारोपण केले. आमचे प्रिय वंदनीय गुरुवर्य कै. डॉ. चंद्रकांत गंगाराम कोलते यांच्या नम्र स्मृतीप्रित्यर्थ अर्जुन वृक्षाची लागवड करण्यात आली. समाजाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”

Screenshot

या अभियानासाठी मणिपाल हॉस्पिटलचे प्रायोजकत्व लाभले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सर्वच डॉक्टरांनी विशेष परिश्रम घेतले. सहभागी सर्व डॉक्टर्स आणि सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आयोजकांनी आभार मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 9 7 0 4
Users Today : 1
Users Yesterday : 154