वाघोली:प्रतिनिधी( विनायक साबळे)
युवासेना पुणे जिल्हाप्रमुख गणेश बाळासाहेब सातव पाटील यांच्या ४ जुलै रोजी होणाऱ्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. वाढदिवसाचा गाजावाजा न करता शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

युवासेना पुणे जिल्हा, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवासेना हवेली तालुकाप्रमुख विक्रम बापू वाघमारे तसेच माजी सरपंच प्रमोद हरगुडे पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गणेश सातव पाटील यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त ३४ हजार फुलस्केप वह्या, ३ हजार ४०० शालेय दप्तरांसह विविध शालेय उपयोगी साहित्याचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. शिक्षणासाठी आवश्यक साहित्याचा अभाव कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रगतीच्या आड येऊ नये, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

हा उपक्रम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे तसेच संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आयोजित करण्यात येत आहे. युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव राहुल लोंढे, आमदार ज्ञानेश्वर कटके, युवासेनेचे निरीक्षक बाजीराव चव्हाण, सचिव किरण साळी आणि संपर्कप्रमुख अनिकेत जावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडणार आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधत समाजसेवा आणि शिक्षणाला प्राधान्य देण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार असून, हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.





Users Today : 2
Users Yesterday : 79