शिरूर प्रतिनिधी: संतोष साळुंके
सोलापूर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श बाल व प्राथमिक मंदिर येथे प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांची चांदोमामा ही कविता शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या भिंतीवर घेतली असून येता जाता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ती कविता वाचत असल्याने ही कविता शाळेचे आकर्षण ठरली आहे.

15 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या. प्रत्येक शाळेत शाळा प्रवेशोत्सवाची व मुलांच्या स्वागताची वेगवेगळी तयारी केली जाते. आदर्श बाल व प्राथमिक मंदिर शाळेमध्ये प्रवेशोत्सव दरवर्षी वेगवेगळ्या थीमद्वारे साजरा करण्यात येतो. यावर्षी जंगल थीम, झाडे लावा पर्यावरण वाचवा असा विषय ठेवला होता. त्यावर आधारित वेगवेगळ्या विषयांची पोस्टर्स तयार करण्यात आली होती. योगायोगाने सचिन बेंडभर यांची चांदोमामा ही कविता लेखिका आशा पाटील यांच्या वाचनात आली. ती विषयाला अतिशय समर्पकशी वाटली. मग त्याची डिजिटल प्रिंट काढून त्यांनी ती शाळेमध्ये लावली. मुलांना व पालकांना ती खूप आवडली. येताजाता सर्वच ही कविता वाचत असल्याने मुलांना वाचनाची गोडी लागली आहे.

आदर्श बाल व प्राथमिक विद्या मंदिर या शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका माया धनंजय सांगोलकर व उपक्रमशील शिक्षिका आशा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.





Users Today : 3
Users Yesterday : 57