निर्माण प्लाझावर झाला “निर्माण” चा जन्म… म्हणून नागरिकांनी केला जल्लोष…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर
महिलांनी बाळाचा चेहरा पाहताच सर्वांच्या मनावर एक हास्य उमटले …. टाळ्यांचा कडकडाट आणि निर्माण प्लाझावर झाला “निर्माण” चा जन्म… असे म्हणून नागरिकांनी केला जल्लोष…

यावेळी उपस्थित नागरिकांनी महिला डॉक्टर पोटे व मदतीला धावणाऱ्या नगरसेविका पूजा पोटावळे,महिला पत्रकार यांचे कौतुक केले. आणि माणुसकीला माणूस आला धावून असेच म्हणावे लागेल आजही माणुसकी शिल्लक आहे.

शिरूर जोशीवाडी येथील एक गरोदर महिला प्रस्तुती कळा व पोटात दुखत असल्याने शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे पायी पायी जात असताना निर्माण प्लाझा येथे प्रचंड प्रसूती कळा सुरू झाल्या आवाज वाढला आणि काही वेळातच महिला रस्त्यातच बसली काही कळायच्या आत तिने रस्त्यातच बाळाला जन्म दिला असे तेथे उपस्थित महिलांच्या लक्षात आले वेळ वाया नघालता तोंडाचे स्कार्फ खाली आले त्याबरोबर आणि काही महिलांनी शेजारील पडवळ कुटुंबाकडून साड्या घेतल्या तर काहींनी स्कार्फ घेऊन सर्व बंदिस्त केले. ही घटना पत्रकार सुदर्शन दरेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी डॉक्टर संतोष पोटे यांना घटना सांगितली काही वेळात शिरूर येथील नगरसेविका डॉ. सुनिता पोटे, नगरसेविका पूजा पोटावळे घटनास्थळी पोहचल्या.

त्या ठिकाणी महिला प्रस्तुती झालेल्या नवजात बालकाला आपल्या मांडीवर घेतले होते तर तिचा पती डोक्याला हात लावून तिथे बसला होता काही वेळातच महिलांनी तोंडाचे स्कार्फ व साड्यांनी वेढा दिला या रस्त्याने येणाऱ्या रिक्षा चालकांनी मेडिकल स्टोर वाल्यांनी या वेळेत मदत केली. मुलाची नाळ कापून सर्व सोपस्कार व्यवस्थित करून श्वास व न रडणाऱ्या मुलाला डॉक्टर सुनिता पोटे यांनी त्यांच्या टेक्निकने काही वेळा आणि रडायला लावले आणि मग बाळाचे एक दर्शन सर्व नागरिकांना दिले.. काही वेळापूर्वी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण बाळाचा चेहरा पाहताच एकच जल्लोष टाळ्यांचा कडकडाट आणि एक हास्य आणि निर्माण प्लाझावर झाला निर्माण या मुलाचा जन्म असे म्हणत नागरिकांनी उपस्थित सर्व डॉक्टरांचे पत्रकार नगरसेविका व त्यांच्या मदतीला आलेले रिक्षा चालक मेडिकल वाले यांचे आभार मानले. त्यानंतर बाळाला व त्याच्या आईला डॉक्टर पोटे यांच्या मिरा नर्सिंग होम येथे घेऊन प्राथमिक उपचार केल्यानंतर बाळ आणि त्याच्या आईची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉ सुनिता पोटे यांनी सांगितले.

Screenshot

अखेर एका गरीब महिलेची प्रसूती आणि माणुसकी आली मदतीला असेच म्हणावे लागले…. हा देश सर्व जाती धर्माचा आहे येथे उच्च नीच असे पाहिले जात नाही अडचणीच्या काळात एका गरीब महिलेच्या मदतीला महिलांबरोबर डॉक्टर पत्रकार नगरसेविका मेडिकलवाले धावून येतात आणि काही वेळात एका गोंडस बाळाचा जन्म होतो. यावेळेस मदत करणाऱ्या सर्वांना जो आनंद होतो किंवा आम्हाला झाला आहे हा आनंद सर्वोच्च आहे.

डॉ. सुनिता पोटे, नगरसेविका, डॉक्टर, मिरा नर्सिंग होम शिरूर.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 3 0 2 1
Users Today : 583
Users Yesterday : 39