मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके
भविष्यात शेत जमिनीवरील बांधा वरून वाद होऊ नये म्हणून मांडवगण फराटा तंटामुक्ती समिती अध्यक्ष हनुमंत अण्णा फराटे पाटील आणि उपाध्यक्ष राम शेठ जगताप यांनी बांधावर डांब बसवून ,भविष्यात कोर्ट,कचेऱ्या कडे फेऱ्या मारून ,पैशाचा अपव्यय होणार नाही,या साठी हा उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमास मांडवगण मधील शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतआहे.
या कामासाठी आदर्श पोलिस पाटील बाबा पाटील फराटे यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत आहे ,त्याच प्रमाणे या उपक्रमास घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे इनामदार यांचे पण मोलाचे सहकार्य नेहमीच लाभत असते .असंख्य तंटे मिटवून ,आपापसात नेहमीच सलोख्याचे वातावरण राहावे यासाठी मांडवगण तंटामुक्ती समिती अग्रेसर असते.
शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ पंढरपूर येथे संपन्न…..
प्रसिद्धी साठी नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी हा उपक्रम सर्व शेतकरी बांधवा पर्यंत पोचला पाहिजे.आणि इतर गावांमध्ये पण हा उपक्रम राबविला पाहिजे.





Users Today : 7
Users Yesterday : 117