माजी आमदार अशोकबापु पवार यांच्या प्रयत्नांनी सणसवाडी येथे १२ तासात मिळाला ट्रान्सफॉर्मर

Facebook
Twitter
WhatsApp

सणसवाडी (ता. शिरूर) येथील आनंदनगर व भैरवनाथनगर येथील ट्रान्सफार्मर जळाला होता. याबाबत तेथील नागरिकांनी सरपंच शशिकला सातपुते ,उपसरपंच राजुआण्णा दरेकर,पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडितआप्पा दरेकर व माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे ,यांना याबाबत अडचण सांगितली असता,दरेकर यांनी आमदार अशोकबापु पवार यांच्याशी संपर्क साधून दोन दिवसांपासून पासुन लाईट नसल्याची समस्या सांगितली .

माजी कार्यसम्राट आमदार अशोकबापु पवार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने ट्रान्सफॉर्मर बसवण्याची सूचना केली.

माजी कार्यसम्राट आमदार अशोकबापु पवार यांनी आनंदनगर व भैरवनाथनगर येथील नागरिकांनी ट्रान्सफॉर्मर जळाला असून दोन दिवसांपासून लाईट नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे सांगितले .

अभियंता सुमित जाधव तत्काळ मदत :

आमदार पवार यांनी तातडीने संबंधितांशी संपर्क साधत तातडीने ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सूचना केली असता अवघ्या १२ तासात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला. शिक्रापूर उप कार्यकारी अभियंता सुमित जाधव , कोरेगाव सहाय्यक कार्यकारी अभियंता बाळासाहेब टेंगळे यांनी सहकार्य केले.

शिरूर ते पुणे रोडलगत प्लॉटिंग साठी जागा हवी असेल संपर्क:9890457969

 

तातडीने ट्रान्सफॉर्मर बसवल्यामुळे आनंद नगर व भैरवनाथ नगर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत, माजीआमदार कार्यसम्राट अशोकबापु पवार, सरपंच शशिकला सातपुते,पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडितआप्पा दरेकर, उपसरपंच राजुआण्णा दरेकर ,माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 7 1
Users Today : 6
Users Yesterday : 7