शिरूर प्रतिनिधी:
शिरूर मधील कुंभार आळी नवरात्र उत्सव मंडळात नवरात्र उत्सव निम्मित अनेक सामाजिक उपक्रम घेतले जातात त्या पैकी दर वर्षी विधवा महिलांच्या हस्ते देवींची आरती केली जाते.
कुंभार आळी नवरात्रीचे ४ थे वर्ष:
या वर्षी मंडळाचे चौथे वर्ष आहे. या वर्षांमध्ये अनेक सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रम मंडळाच्या वतीने हाती घेतले जातात.ज्या महिला त्यांचा दोष नसताना त्यांच्या नशिबी वैधव्य आले आशा महिलांना आपल्या समाजात देव कार्यात सहभागी करून घेतले जात नाही. आशा महिलांचे दुःख जाणून कुंभार आळी नवरात्र मंडळाने गेले चार वर्ष देवीच्या सर्व कार्यात आशा महिलांना सहभागी करून घेतले आहे व त्यांच्या हातून मानाची आरती केली जाते.
विधवा महिलाना आरतीचा मान देणारे अनोखे मंडळ:
आज झालेल्या आरती मुळे अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पहावयास मिळाले. या वेळी ज्या ज्या विधवा महिलांना आरती करता आली त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले व आशा कार्यात आम्हाला सहभागी करून घेतले जाते या विषयी समाधान आणि आनंद व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रत प्रथमच अनोखा उपक्रम:
कुंभार आळी मधील कुंभार समाजाच्या वतीने २०१८ साली विधवा अनिष्ठ प्रथा बंदी ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. महाराष्ट्रात असा ठराव करणारा शिरूर मधील कुंभार समाज हा पहिला ठरला.त्या दिवसापासून कोणतेही देव कार्य असले तरी त्यात विधवा महिलांना समानतेची वागणूक दिली जाते. दुर्दैवाने एखाद्या महिलेच्या नवऱ्याचा मृत्यू झाला असेल तर ,स्मशानात त्या महिलेचे मंगळसूत्र, जोडवे, बांगड्या, कुंकू बळजबरीने उतरवण्याची प्रथा आहे .ती २०१८ पासून बंद केली गेली असे या वेळी कुंभार समाज अध्यक्ष योगेश जामदार यांनी सांगितले.
या वेळी परिसरातील सर्व महिला, तरुण, तरुणी, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
