कॅन्सरग्रस्त आजीच्या घरी राजू दिनकर कोळपे यांनी केली चोरी…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर शहरातील इंदिरा नगर, पेट्रोल पंपा जवळ शिरूर येथे येकट्याच निराधार राहणाऱ्या कमल दत्तू मलगुंडे वय ६० या महिलेने स्वतः च्या कॅन्सर आजाराच्या उपचारांसाठी घरात काही स्वतः च्या मालकीच्या वस्तू व घर विकून रोख स्वरूपात पैसे गोळा करून ठेवले होते.
दि.10/08/2025 रोजी कमल मलगुंडे यांचे नातजावई राजू दिनकर कोळपे व त्यांची नात शिवानी राजू कोळपे हे आजारी असणाऱ्या मालगुंडे यांना भेटण्यास आले असता,त्या बेडवर झोपल्याचा फायदा घेत,त्यांच्या नातजावई व नातीने आजीने ठेवलेल्या उपचाराचे 5 लाख रुपये त्यांच्या परवानगी शिवाय चोरून नेले.
दुसऱ्या दिवशी त्यांना उपचारांसाठी पैसे हवे असताना त्यांनी कपाटात पाहिले असता तेचोरी झाल्याचे लक्षात आले.त्या दोन दिवसात दुसरे कुणी घरी न आल्याने त्या दोघांनी पैसे चोरले असल्याची खात्री झाल्याने त्यांनी त्या दोघांना माझ्या उपचाराचे पैसे तुम्ही चोरून का घेऊन गेले,ते परत करा असे बोलले असता,राजू कोळपे व त्याचा भाऊ सुरेश कोळपे यांनी आजींच्या घरी येऊन शिवीगाळ करत त्यांचा गळा दाबून मारहाण केली,शेजारी राहणारे लोक गोळा झाल्याने त्यांनी गाडीतून पळ काढला.
कमल मलगुंडे यांनी दि.२९/०८/२०२५ रोजी शिरूर पोलीस स्टेशन येथे राजू कोळपे व शिवानी कोळपे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून,शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या मार्गदर्शना खाली नाथा जगताप पुढील तपास करीत आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 5 5 3 0 5
Users Today : 13
Users Yesterday : 22