शिरूर प्रतिनिधी:
संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमतः घेण्यात येत असलेल्या महिलांनी महिलांसाठी घेतलेल्या दही हंडी चे हे तिसरे वर्ष असून,ही महिला दही हंडी शिरूर शहरात घेण्यात येते.या महिला दही हंडी चे आयोजन महिला करतात व सर्व शिरूर तालुक्यातील शाळेमधील मुलीचे संघ यामध्ये सहभाग घेतात.
महिला दही हंडी साठी एकून सहा टीम
या आगळ्या वेगळ्या महिला दही हंडीचे हे तिसरे वर्ष होते, तर यावेळी सिताबाई थिटे डी फाम कॉलेज शिरूर, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव,सिताबाई थिटे बी फाम कॉलेज शिरूर,आय टी के बी कराटे क्लास शिरूर व निमगाव गावच्या सामाजिक कार्यकर्त्या उज्वला इचके यांनी विशेष परिश्रम घेऊन निमगाव भोगी येथून मुलीचा संघ स्थापन करत ,दही हंडीत सहभागी झाले.
या महिला दही हंडी हंडी कार्यक्रमाची सुरुवात शिरूर हवेली चे आमदार माऊली कटके यांच्या पत्नी सौ मनीषा ताई कटके यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून,दीप प्रज्वलित करून व नारळ फोडून करण्यात आली.
महिला ही आता माघे नाहीत:मनीषा कटके 
मनीषा काकी कटके यांनी कार्यक्रमाच्या वेळी ,आयोजकांचे विशेष आभार मानत यापुढे ही या महिला दही हंडीत जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे व आपल्या शिरूर तालुक्याचे नाव मोठे करावे ,आपण महिला ही कोणत्याही खेळात माघे नाही हे दाखवून द्यावे.
तर उपस्थीत मान्यवरानमध्ये प्राजक्ता ढोबळे,शोभना पाचंगे,मनीषा कालेवर,स्नेहलता यादव,सुवर्णा सोनवणे,ऋतिका झांबरे,साधना शितोळे,मीरा परदेशी,सुनीता कुरंदले,विशेष पाहुणे म्हणून सागर दंडवते,चेतन साठे,योगेश जामदार,कैलास सातव,विठ्ठल घावटे ,पत्रकार मुकुंद ढोबळे,निघोज चे पत्रकार श्रीमंडिलकर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
या महिला कार्यक्रमा साठी शिरूर येथील रुबी हॉल हॉस्पिटल चे मायकल पॉल सर -युनिट हेड रुबी हॉल शिरूर,तर रूबी हॉल हॉस्पिटल ची ॲम्बुलन्स व त्यात डॉक्टर व नर्सिंग स्टाफ ही या हॉस्पिटलने उपलब्ध करून दिला.
मानवंदना देत
या आलेल्या पाच टीमने दही हंडी ला मानवंदना देत कार्यक्रमाची सुरुवात केली व सीताबाई थिटे डी फामच्या मुलींनी सलग दुसऱ्या वर्षी दही हंडी फोडण्याचा विक्रम नोंदवला.
Adv काजल थोरात यांनी पंच म्हणून:
या कार्यक्रमाचे पंच म्हणून adv काजल संजय थोरात व अमृत झांबरे हे लाभले,तर कार्यकर्माचे सूत्र संचालन संतोष झंजाड व किरण झांबरे यांनी केले.
या महिला दही हंडी चे आयोजन स्वराज्य रक्षक फाउंडेशन व पुणे ग्रामीण च्या संपादक शोभा परदेशी व वेलफेअर फाऊडेशन नम्रता गवारे यांच्या वतीने करण्यात आले होते.
