शिरूर शहरातील गरीब लोकांच्या रोजगारावर पुन्हा हातोडा…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
आंदोलन कर्त्याच्या मागणीनुसार पथ पथावरील झालेल्या अतिक्रमण काढणे हे असताना,शिरूर शहरातील फक्त गोरगरीब जनतेच्या टपऱ्या आज काढतानाचे चित्र दिसत आहेत.
आज संध्या काळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी यांनी सांगितल्या प्रमाणे ज्या टपऱ्या ना चाके आहेत,ज्या रात्री घरी घेऊन जाता येतील,अशा टपऱ्या सोडता,ज्या कायम स्वरूपी करण्याच्या प्रयत्न करण्यात आल्या होत्या,अशा टपऱ्या वर कारवाई करण्यात आली आहे.

अनेक चाके नसणाऱ्या व कायम स्वरूपी केलेल्या अनेक टपऱ्या आहे तशाच:

हे असे पत्रकार परिषदेत सांगितले असताना,वास्तविक परिस्थिती वेगळी पाहवयास मिळत आहे. पद पथावर अनेक अशा टपऱ्या दिसत आहेत की त्यांना चाके नाहीत व असतील तर ती चालणारी नाही.
आजच्या कारवाई नंतर नागरिकांच्या चर्चेतून समोर आलेल्या माहितीनुसार शहरातील माजी नगरसेवकांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी पतपथावरील अतिक्रमणे तसेच ठेवून शहरातील इतर गोरगरीब जनतेचे अतिक्रमणे प्रशासनाने काढली गेली आहेत.
तसेच मुख्य बाजारपेठेतील व्यवसायिकांचे अतिक्रमणे वर्षानुवर्षे तसेच ठेवून फक्त रोड वर येणारे बोर्ड काढत कारवाई झाली,असे दाखवण्यात आले आहे.

सत्ता व पैसा असेल तर?

याचा अर्थ सत्ता प्रस्थापितांच्यासाठीच राबवत असल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून आले. चार दोन पद पथावर व्यवसाय करणारे परंतु आलिशान गाडी घेऊन फिरणार्या लोकांना,गोरगरीबाची टपरी उचलून घेऊन जाण्याचे दुःख समजणार नाही.

आज कार्यवाही होत असताना व्हिडिओ क्लिप मध्ये जे आजी-माजी नगरसेवक कारवाई रोखण्यासाठी दिसून येत आहेत,त्यांना जनतेने खरच नाकारले पाहिजे व येणाऱ्या निवडणूकी मध्ये ही निवडणूक अधिकाऱ्यांनी यांना अपत्र ठरविले पाहिजे.आज नवखे व बिनधास्त काम करणारी युवा पिढी पुढे येत आहे.त्यांना गोरगरीब जनतेने साथ दिली,तरच पुढील काळात त्यांच्या टपऱ्या वाचतील किव्हा सरसकट कारवाई होईल.

शेवटी ही संपूर्णता कारवाई देखाव्यासाठीच केली आहे असे सर्व सामान्य जनतेला वाटते,यात शंका नाही. नगरपालिका मुख्याधिकारी व प्रशासन हे कोणाच्यातरी दवाबाखाली काम करताना दिसून येत आहे का?मुख्याधिकारी फोन कॉल जर तपासले तर या प्रकरणाचा उलगडा समोर येईल,अशी ही चर्चा कारवाई दरम्यान नागरिकामध्ये सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्याने या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 5 5 3 0 5
Users Today : 13
Users Yesterday : 22