शिरूर प्रतिनिधी:
मांडवगण फराटा येथील बालाजी श्रीरंग कांबळे यांचा मुलगा श्रेयश बालाजी कांबळे हा मांडवगण येथील ,श्री. वाघेश्वर विद्याधाम प्रशाला येथे इयत्ता ८ वी (क) या वर्गात शिकत आहे.
तो दररोज स्कॉलरशिपच्या ताशीकेसाठी सकाळी ठीक ९:२० वा. प्रशालेत जात असतो. त्यामुळे त्याला जेवणासाठी लागणारा डबा लवकर तयार होत नसल्याने दररोज बालाजी कांबळे किंवा त्यांची मिसेस शाळा भरल्यानंतर साधारण ११:३० वा. ते१२:३० च्या दरम्यान त्याला डबा देण्यासाठी जात असतात.
बुधवार दि.३०/०७/२०२५ रोजी नेहमीप्रमाणे बालाजी कांबळे हे त्यांच्या मुलाला जेवणाचा डबा देण्यासाठी १२:०५ मिनिटांनी गेले असता, गेटवर कोणीही हजर नव्हते.१५ मिनिटे वाट पाहिल्यानंतर शिपाई राहुल अभंग व गणेश वेताळ हा शिक्षक व इतर एक शिक्षक नाव माहित नाही हे शाळा चालू असताना देखील गावातून शाळेत येत असताना १२:२० वा बालाजी यांची शाळेच्या गेटवर ठेवण्यात आलेल्या आवक जावक रजिस्टर ला शिपाई राहुल अभंग यांनी नोंद घेतली.
ही नोंद घेत असताना शिक्षक गणेश वेताळ जे बाहेरून शाळेत येत होते ते बालाजी यांच्या जवळ गेले व त्यांना म्हणाले कांबळे “आले का आमच्यावर उडायला”! त्यावेळेस त्यांच्या सोबत असणारे इतर दोन पालक मोहन शेलार आणि नारायण साळवे हे देखील त्यावेळेस उपस्थित होते.
शिक्षक गणेश वेताळ ने असे गलिच्छ बोलल्यानंतर बाळाजी हे त्यांना म्हणाले की, सर तुम्ही असे घाण का बोलत आहात? तरीही त्या शिक्षकाची कोणत्याही परिस्थितीत ऐकून घेण्याची भूमिका नव्हती. ते उलट त्यांच्या अंगावर अनेकदा धावून जात,अतिशय गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत त्यांना ,त्यांच्या सोबत असलेल्या पालकांसमोर अपमानित करून त्यांना म्हणाले “तुला लय माज आला आहे, तुझ्याकडे मी बघतोच, मागे पण तू माझ्या बाबतीत मुख्याध्यापकांना माझ्या तक्रारी केलेले आहेत”. त्यामुळे तू तेव्हापासून माझ्या चांगलाच डोक्यात असून तुझा कार्यक्रम मी करणारच आहे.
वरील घटना चालू असतानाच बालाजी कांबळे यांनी विद्याधाम प्रशाला या संस्थेचे सचिव नंदकुमार निकम यांना फोन करून,वरील शिक्षकाबद्दल सांगत असताना ,त्या शिक्षकाने,माझे नाव गणेश वेताळ आहे सांगा त्या निकम ला, नाहीतर अध्यक्षाला मी कोणालाच भीक घालत नाही. माझी बायको पण याच शाळेत पर्यवेक्षक आहे. त्यावेळेस बालाजी यांचा फोन संस्थेचे सचिव नंदकुमार निकम यांच्याशी चालू होता.वरील सर्व हकीगत सांगितल्यानंतर निकम यांनी सांगितले की तुम्ही प्रशालेचे मुख्याध्यापक यांना पण कळवा.
त्या नंतर बालाजी कांबळे यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक रामदास चव्हाण यांनावरील घटनेची हकीगत सांगितली.
गणेश वेताळ दारू पिऊन शाळेत:
मुख्याध्यापक कांबळे यांना म्हणाले की, मी प्रशालेत आल्यानंतर चौकशी करून तुम्हाला बोलवतो.
गणेश वेताळ या शिक्षकांने कांबळे यांना,जी शिवीगाळ आणि दमदाटी केली याची पार्श्वभूमी अशी आहे की ,कांबळे हे एक ते दीड वर्षांपूर्वी शाळा व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष पदावर असताना याच शिक्षक,गणेश वेताळ यांनी,शाळेच्या वेळी दारू पिऊन आला होता. त्यावेळेस ही बाब काही विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितल्यानंतर ,त्यांनी त्यांना शाळेत भेटल्या नंतर त्या शिक्षकाच्या तोंडातून दारूचा उग्र वास येत होता व त्यांची शरीर सतत कोलमडत होते. त्यामुळे त्यांना कांबळे यांनी समजावून सांगितले होते की शाळेच्या वेळेत दारू पीत नका जाऊ. त्याचबरोबर काही महिन्यापूर्वी अशीच एक पालक तक्रार घेऊन प्रशालेत आल्यानंतर गणेश वेताळ याने त्या पालकास अवाच्च भाषेमध्ये शिवीगाळ केली होती.याबाबत काबळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना तोंडी तक्रार करून समज दिली होती कि,जाऊद्या एखाद्याची नोकरी जाऊ नये म्हणून मी त्यांना एकदा दोनदा संधी दिली. हाच राग मनात धरून गणेश वेताळ या शिक्षकाने दि.३०/०७/२०२५ रोजी बाळाजी कांबळे यांना अश्लील शिवीगाळ देऊन मला अपमानित केले. व दमदाटी केली.
बालाजी यांच्या मुलाच्या जीविताश धोका:
गणेश वेताळ या शिक्षकापासून बालाजी यांचा मुलगा जो इयत्ता ८ वी (क) मध्ये शिकत आहे त्याच्या शैक्षणिक करिअर वर व त्याच्या आणि कांबळे यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचे व सदरील शिक्षकाची सखोल चौकशी करून ,शिक्षक गणेश वेताळ यांस सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असे पत्र मुख्याध्यापक श्री.वाघेश्वर विद्याधाम
प्रशाला मांडवगण फराटा ,मा. ठाणे अंमलदार पोलीस औटपोस्ट मांडवगण फराटा
व सचिव शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर यांना दिले आहे.
