शिरूर प्रतिनिधी: अहिल्यानगरच्या विद्यमान खासदाराच्या फोनमुळे नियमभंग फौजदारी गुन्हा करणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी गुन्हा दाखल न करता सोडून दिल्याची घटना शिरूर शहरात घडली आहे.याचा अर्थ कायद्याचे रक्षण करणारे,आता गुन्हेगाराचे संरक्षण करू लागले आहेत.
“सत्यमेव जयते” की “सत्तेमेव जयते”? शिरूरमध्ये कायदा गहाण.
शिरूर तहसील कार्यालयाबाहेर वाहननोंद MH ४३ BN ४६४५ रजिस्ट्रेशन असलेल्या काळ्या रंगाच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीवर कायदेशीर अधिकार नसतानाही एका व्यक्तीने बिनधास्त “लोकसभा सदस्य खासदार”, भारतीय राजमुद्रा आणि “सत्यमेव जयते” असा लाल रंगातील स्टिकर लावलेला दिसून आला.
वाहतूक पोलीस आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांना,समजले की ही गाडी सूर्यभान एकनाथ धुरपते या व्यक्तीच्या नावावर आहे.ही गाडी पोलिस ठाण्यात नेल्यावर समजले की तो व्यक्ती शिरूर पोलिस ठाण्यात पिस्टल परवान्याबाबत च्या काहीतरी कामासाठी आला होता आणि तो अहिल्यानगरचे विद्यमान खासदार निलेश लंके यांचा कार्यकर्ता असल्याचे बोलत होता.
भारतीय राज्य चिन्ह वापराचे नियम २००७, भारताचे राज्य चिन्ह (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायदा,२००५ व याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदी आणि मोटार वाहन अधिनियम यानुसार हा प्रकार सरळसरळ गैरकायद्याचा आणि अत्यंत गंभीर फौजदारीपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे.
पोलिस निरीक्षक यांच्या दालनाच्या मागील बाजूस असलेल्या कक्षात वाहतूक पोलीस राजेंद्र वाघमोडे हे फिर्याद टायपिंगचे काम सुरू असताना, समाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या सोबत असलेल्या वकील साहेबांशी कायदेशीर कारवाईसंदर्भात चर्चा करत असताना ,गाडीवर अशा प्रकारे चुकीचा स्टिकर लावलेला संबंधित कार्यकर्ता स्वतःचा फोन घेऊन आला आणि म्हणाला लंके साहेब फोनवरआहेत ,लंके साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे.
एक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार महाशयांचा मान राखत फोन स्पीकरवर टाकत वाळुंज हे फ़ोन वर बोलू लागले तर,समोरून आवाज आला निलेश लंके बोलतोय, असे सांगून बोलत असताना त्यांना प्रकरणाचे गांभीर्य वाळुंज यांनी सांगितले ,पण त्यांचा स्वर लोकप्रतिनिधीचं भान विसरून, दादागिरीच्या पद्धतीने ऐकू येत होता. हे पाहून वाळुंज यांनी फ़ोन मधे व्हॉइस रेकॉर्डिंग सुरू केले आणि यातील काही संभाषण त्यांनी रेकॉर्ड केले.
हा सर्व प्रकार घडत होता,त्यावेळी खासदार अधिवेशनाला होते, अशी माहिती वाळुंज यांना समजली.मग अधिवेशन सोडून जनतेचे प्रश्न न सोडवता, कायद्याचे उल्लंघन करत जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं हे अजून गंभीर आहे.
यानंतर काही वेळातच पोलिस निरीक्षक पोलीस ठाण्यात पोहोचले.
त्यांचं उत्तर तर अधिकच धक्कादायक होते ,ते म्हणाले
“खासदार लंके साहेबांचा मला फोन आला होता. ते म्हणाले, ‘मी पण ही गाडी कधी कधी वापरतो. काय होतंय लावलं तर स्टिकर?’
आणि जर त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला तर उद्या माझ्यावर हक्कभंग आणतील.” मी खासदार साहेबांना सुचवले आहे की स्टेशन डायरीत नोंद घेऊन, दंडात्मक कारवाई करून गाडी सोडवली जाऊ शकते ,आम्ही लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते दोघांचाही मान ठेवत काम करतोय, असे pi म्हणाले.
यावेळी वकील आणि पत्रकार उपस्थित असताना ही वरील प्रकार शिरूर पोलीस ठाण्यात घडला.
निलेश वाळुंज यांनी पोलिस निरीक्षकांना खासदारांचे फोनवरचे बोलणे देखील ऐकवले ,तरीही कायद्यापेक्षा खासदार मोठा, अशीच भूमिका त्यांची दिसली.
“खरेतर कायद्याचा मान ठेवणे प्रथम कर्तव्य असतानाही, तो पूर्णपणे डावलला गेला.”
हा प्रकार स्पष्टपणे कायद्याचा अपमान, पोलीस यंत्रणेची राजकीय गुलामीकडे वाटचाल, आणि लोकशाहीची हत्या करणारा दिसतो.
यावरूनसामाजिक कार्यकर्ते यांनी दि.०२/०८/२०२५ रोजी पत्रकार परिषद घेत पुढील गोष्टी तात्काळ व्हायला हव्यात
1)संबंधित कार्यकर्त्यावर
भारतीय राज्य चिन्ह कायदा २००७,राज्य चिन्ह (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायदा २००५, व बीएनएस मधील तरतुदींसह ,मोटार वाहन अधिनियम अंतर्गत
गुन्हा दाखल व्हावा.
2)तो नेमका कुणाच्या पिस्टल परवान्याच्या कामासाठी आला होता? त्याला पिस्टल दिले आहे? असेल तर
त्याला पिस्टल कोणत्या आधारावर दिले? कोणत्या आधारावर?
बेकायदेशीर चिन्ह लावून त्याचा काही आणखी गैरवापर झाला का?
याची चौकशी व्हावी.
3)शिरूर पोलिस निरीक्षकांची स्वतंत्र चौकशी व्हावी.BNS कलम ५९,म.ना.से.व.नि. १९७९ – नियम ३,म.ना.से.शि.व. अपील १९७९,विभागीय चौकशी नियम म.पो.अधिनियम कलम २५ अन्वये चौकशी करावी.
4)खासदार निलेश लंके यांनी फोनद्वारे केलेला बेकायदेशीर हस्तक्षेप, नागरिकांशी कायद्याचा अवमान करून बेशिस्तपणे बोलणं हे “पदाचा दुरुपयोग” ठरतो ,त्यावर संसदीय चौकशी व्हावी.अशा आशयाचे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी दिले आहे.
