शिरूर प्रतिनिधी:
शिरूर ग्रामीण येथील रामलिंग रोड येथे नव्याने सुरू झालेल्या श्री रामदेव सुपर मॉल ,येथे दि.३०/०७/२०२५ रोजी घेण्यात आलेल्या किराणा माल मधील गुळा मधे मोठ्या आकारच्या आळ्या सापडल्या आहेत.
गूळामध्ये आळ्या बरोबर मोठ्या प्रमाणात बुरशी:
श्री रामदेव सुपर मॉल मधील ३० रोजी ची किराणा खरेदी नंतर,आज दि.३१ रोजी पुन्हा एकदा पाहिले असता,गुळात फक्त आळी नाही तर ,जवळ जवळ प्रत्येक प्रकारच्या गुळाच्या ढेपेला बुरशी आलेली दिसत आहे.
खेडे गावातील ग्राहक वर्ग:
या मॉल मध्ये येणारा ग्राहक वर्ग हा खेडे गावातील आहे. त्यांना इग्रजी वाचता येणे शक्य नाही. अशा वेळेस डोळ्यास चांगल्या दिसणाऱ्या व गरजेचा माल हा ग्राहक घेत असतो.
विशेष बाब ही की कोणत्याही मालाला खराब होण्याची एक तारीख असते व ती तारीख माल पॅकिंग पासून ठरावीक दिवस,महिने तर काहींना ठराविक वर्ष असते,हे या खेडे गावातील लोकांना माहीत नसते.
याचाच फायदा असे मोठ्या प्रमाणात सामान एकाच ठिकाणी ठेऊन हे मॉल वाले घेताना दिसत आहेत.या अशा मोठ्या मॉल मधील सामानच्या किमती व त्यावरील बरीच माहिती पुसट झालेली दिसते.त्यामुळे पॅकीग तारीख व माल एक्सपायरी होण्याची तारीख समजणे अवघड जाते.
रामलिंग रोड वरील स्वीट होम,पाठोपाठ आता मॉल मधील गुळात बुरशी व आळइ:
काही दिवसांपूर्वी रामलिंग रोड येथील एका स्वीट होम मधील पावात ही असाच काही प्रकार घडला होता.या सर्व गोष्टी वरून असेच दिसते की,खेड्या पड्यात व मोठ मोठ्या मॉल मध्ये असणारा माल हा खराब तर येत नाही? किव्हा जास्त दिवस राहिलेला माल हे परत वापरत तर नाही ना?शिरूर तालुक्यातील प्रत्येक स्वीट होम मध्ये असणाऱ्या मिठाई रोज विकल्या नाही गेल्या तर पुढे काय होते? खराब होण्याची तारीख तर मिठाई वर नसते,तर नागरिकांनी काय समजावे?
वरील प्रकारामुळे असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
