शिरूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :
शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयामध्ये आज सोमवार दि.२२ जुलै २०२५ रोजी सकाळी९.०० ते ५.००वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी शिरूर शहर व शिरूर तालुका यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व दूरदृष्टी असलेले नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका यांच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

रक्त दान शिबिराचे उद्घाटन:

या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे शिरूर तालुकाध्यक्ष राहुल दादा पाचर्णे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मा. उपाध्यक्षा जयश्रीताई पलांडे,धर्मेंद्र खांडरे, आदर्श सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे,एकनाथ ( पप्पू)शेलार अध्यक्ष युवक भाजपा शिरुर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.

प्रमुख पाहुणे म्हणून:

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये शरद कालेवार संचालक खरेदी विक्री संघ शिरुर,दिलीप हिंगे संयोजक पश्चिम महाराष्ट्र कामगार ,संजय पाचंगे महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडी, नितीन दादा पाचर्णे नगरसेवक,गोरक्ष काळे सह संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मोर्चा, रिटाताई जाधव सरचिटणीस भाजपा पुणे उत्तर ,सुभाष कांडगे सदस्य प्रदेश कार्यकारणी ,आबा सरोदे पंचायत समिती सदस्य, पांडुरंग दुर्गे ज्येष्ठ नेते, रामभाऊ कदम माजी सदस्य पंचायत समिती ,धर्मेंद्र खांडरे नगरसेवक, ज्ञानेश्वर बहिरट सरचिटणीस भाजपा ,महेंद्र नागवडे युवा नेते सोमनाथ नागवडे ,नगरसेवक विनोद भालेराव , उमेश शेळके मा शहराध्यक्ष, संदीप गायकवाड नगरसेवक, केशव लोखंडे माजी शहराध्यक्ष ,अविनाश जाधव सरचिटणीस भाजपा ,निलेश नवले, आप्पासाहेब काळे , पत्रकार अल्लाउद्दीन अलवी सचिव राज्य मराठी पत्रकार परिषद शिरुर तालुका आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115