सहाय्यक अभियंता (राजपत्रित) पदावर नियुक्ती; सलग तिसऱ्यांदा घवघवीत यश!
सातारा प्रतिनिधी: सुदर्शन दरेकर
सामान्य कुटुंबातून येऊन आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सौ. मोहिनी सचिन किर्दत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमधून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात “सहाय्यक अभियंता (राजपत्रित अधिकारी)” म्हणून नेमणूक झाली आहे.
त्यांचे यश प्रेरणादायी असून त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे, 2024-25 या कालावधीत त्यांनी सलग तिसऱ्यांदा यशाला गवसणी घातली आहे.
1. मार्च 2024: स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, जलसंपदा विभाग, पुणे
2. ऑक्टोबर 2024: जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे (मृद व जलसंधारण विभाग)
3. जुलै 2025: सहाय्यक अभियंता (राजपत्रित), सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र
त्यांचे पती श्री. सचिन राजेंद्र किर्दत हे देखील शासकीय सेवेत रायगड जिल्ह्यात मंडळ अधिकारी या उच्च पदावर कार्यरत असून, वडील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत.
अशा सामान्य पार्श्वभूमीतून येऊन मोहिनी किर्दत यांनी केलेली घोडदौड ही नव्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल भिवडी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील लोकांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
