Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

नगरविकास विभागाच्या पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शिरूर नगरपरिषदे ने बाजी मारली

Facebook
Twitter
WhatsApp

शिरुर प्रतिनिधी
राज्यात क्रीडा, संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करणेसाठी तसेच पोषक वातावरण निर्माण करणेसाठी ,राज्य शासनाने क्रीडा धोरण जाहीर केले आहे.
या मध्ये जिल्हास्तरावर अधिकारी / कर्मचारी यांच्याकरिता दि. ०८/१/२०२५ ते दि.११/१/२०२५ या कालावधीत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम बारामती जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायती यांनीआपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये शिरूर नगर परिषदेच्या वतीने साधारण 45 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी भाग घेतला होता. यामध्ये नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालय शिरूर नगरपरिषदेचा पुणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा मध्ये उत्तम सहभाग नोंदवून प्रितम पाटील, प्रशासक तथा मुख्याधिकारी शिरूर,यांच्या मार्गदर्शना खाली १२ पदके तयार करण्यात आली होती .
यामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेत शिरुर संघाचा इतर सर्व संघावर विजय मिळवत “प्रथम विजेता” होण्याचा बहुमान प्राप्त झाला .
तसेच इतर स्पर्धेत मिळालेले यश खालील प्रमाणे, वैयक्तिक स्पर्धेत एकूण १० पदके, पैकी ५ प्रथम विजेते आहेत. यामध्ये प्रदीप साळवे- गोळा फेक प्रथम,प्रदीप साळवे- लांब उडी प्रथम,प्रदीप साळवे- उंच उडी प्रथम क्रमांक, प्रदीप साळवे- १०० मी प्रथम, पंकज माने- थाळी फेक प्रथम क्र., शितल काळे- २०० मी द्वितीय क्रमांक (महिला),शितल काळे- ४०० मी तृतीय क्रमांक (महिला), शितल काळे- ३ किमी द्वितीय क्रमांक (महिला), संदीप चव्हाण- लांब उडी- द्वितीय क्रमांक, रामचंद्र नरवडे- प्रहसन प्रथम क्रमांक, प्रदीप साळवे, नवनाथ मते, संदीप चव्हाण, पंकज माने- *१०० मी रिले प्रथम क्रमांक, तसेच सांघिक स्पर्धेत २ पदके प्राप्त झाले आहेत.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी दि. ११/०१/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार, जिल्हा सह आयुक्त दुर्वास व स्पर्धेत भाग घेतलेले अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.

शिरूर नगरपरिषदेस प्राप्त झालेले बक्षीस वितरण अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले .

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21