Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

इमारत नोंद रद्द करणेबाबत बजावलेल्या नोटिस संदर्भात सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करताना मृत्यु

Facebook
Twitter
WhatsApp

दि. 23 रोजी घोडेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करुजूदेवी डेव्हलपर्स सर्वे नंबर १९८/२
इमारत नोंद रद्द करणेबाबत बजावलेल्या नोटिस संदर्भात सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या दत्तात्रय किसन पोखरकर यांचा ग्रामपंचायत मध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल घडली .
याबाबत घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गणेश दत्तात्रय पोखरकर यांनी माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत घोडेगाव ने दत्तात्रय पोखरकर यांच्या करुजूदेवी डेव्हलपर्स सर्वे नंबर १९८/२ येथील इमारत नोंद रद्द करण्याबाबत नोटीस बजावली होती. या नोटीस संदर्भात दत्तात्रय पोखरकर त्यांच्या पत्नी व अवधूत घोलप यांच्या बरोबर ग्रामपंचायत मध्ये गेले होते .
त्यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू असताना दत्तात्रय पोखरकर यांना अचानक त्रास झाला व ते खाली पडले. त्यांना त्वरित ग्रामपंचायतमध्ये आलेले अवधूत घोलप व इतर लोकांच्या सहाय्याने ,घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले .
डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत झाल्याचे जाहीर केले. याबाबत पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 0 4
Users Today : 12
Users Yesterday : 21