Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

संजयजी बनसोडे यांनी कवी विलास सिंदगीकर यांच्या घरी सदिच्छा भेट

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:
दि . ४ ऑगष्ट २०२४ रोजी रविवारी मा.ना.संजय बनसोडे, (कॅबिनेट मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे ,महाराष्ट्र राज्य )यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य मा .विलास सिंदगीकर यांच्या फकिरा घरी भेट दिली.विलास सिंदगीकर परिवाराच्या वतीने मंत्री महोदयाचा शॉल, पुष्पहार आणि राज्य शासनाचा स्व .यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मिती पुरस्कर प्राप्त “बाजार ” हा कथासंग्रह भेट देऊन सुहृदयी सत्कार करण्यात आला .

यावेळी जळकोट नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष तथा लातूर जि.प.परिषदेचे माजी कृषी सभापती मन्मथअप्पा किडे, जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य चंदन पाटील, जळकोटचे युवा नेतृत्व गोविंद भ्रम्हणा , निराधार समिती , जळकोटचे अध्यक्ष विनायक जाधव, दै.सकाळ चे तालुका प्रतिनिधी विवेक पोतदार, कवी चंद्रकांत मोरे,सी .एम.कांबळे, युवा नेते गजानन दळवे , सरपंच श्रीमती . बायनाबाई कांबळे ,ग्रां.पं.सदस्य नसरोद्दीन पिंजारी, बामणे, भाऊराव सिंदगीकर , नामदेव कांबळे आदी . मान्यवर उपस्थित होते .
यावेळी मंत्री महोदयानी गावकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या . सर्वांशी मनमोकळा संवाद साधला . गृहभेट दौऱ्यात नसतानाही विलास सिंदगीकर यांच्या घरी सुहृदयी भेट दिल्यानंतर ते रेल्वेने उदगीरहून मुंबई कडे रवाना झाले .

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 8
Users Today : 6
Users Yesterday : 21